महाराष्ट्र

माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या पत्नी नर्गिस अंतुले यांचे निधन झाले. त्या ८७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात नीलम, मुबीना आणि शबनम या तीन मुली तसेच त्यांचे जावई मुश्ताक अंतुले असा परिवार आहे. अंतुले यांच्या राजकारणात पत्नी नर्गिस यांनी मोठी साथ दिली होती. इंदिरा गांधी यांचे अतिशय विश्वासू निष्ठावंत सहकारी म्हणून अब्दुल रहमान अंतुले यांची ओळख होती.

नर्गिस यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय वर्तुळातून अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. नर्गीस यांच्यावर गुरुवारी दुपारी आंबेत या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. बॅरिस्टर अंतुले आणि नर्गिस यांचा विवाह १९५७ साली लग्न झाले. बॅरिस्टर अंतुले यांनी ९ जून १९८० मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. बॅरिस्टर अंतुले यांच्या पत्नी नर्गिस यांना लेखन आणि वाचनाची प्रचंड आवड होती.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस