Latur : पत्नीने ओढला नांगर; सरकारने केली मदत, Video 
महाराष्ट्र

Latur : पत्नीने ओढला नांगर; सरकारने केली मदत, Video

विजेच्या तडाख्यात एक बैल दगावल्यानंतर दुसरा बैल खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने शेतकरी गायकवाड यांच्या पत्नी औसाबाई यांनी स्वतःला नांगराला जुंपून शेताची नांगरणी करावी लागली.

Krantee V. Kale

लातूर : लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील शेतकरी काशिनाथ गायकवाड यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला व राज्यभरातून हळहळ व्यक्त करण्यात आली. विजेच्या तडाख्यात एक बैल दगावल्यानंतर दुसरा बैल खरेदी करण्याची आर्थिक क्षमता नसल्याने शेतकरी गायकवाड यांच्या पत्नी औसाबाई यांनी स्वतःला नांगराला जुंपून शेताची नांगरणी केल्याचे या व्हिडिओत दिसून आले होते.

या प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने दखल घेत जिल्हा प्रशासनाला आवश्यक मदतीचे निर्देश दिले. त्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून जवळच्या गोशाळेतून शेतकऱ्याला नांगरणीसाठी बैल उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. तसेच नव्याने बैल खरेदी करता यावा यासाठी ३२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले.

Maratha Reservation : उत्सवात विघ्न नाही; मनोज जरांगेंचा निर्वाळा, अंतरवाली सराटीत आज बैठक, मुंबई आंदोलनाचा कार्यक्रम ठरणार

Mumbai Rain : आजपासून पुन्हा पाऊस; मुंबईत यलो अलर्ट

BRICS Summit 2026 : आजपासून दिल्लीत ब्रिक्स शिखर परिषद

Navi Mumbai : सचिवांच्या तोंडाला काळे; MPSC च्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे आंदोलन

लंडनमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांची घोषणा