महाराष्ट्र

प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीला स्थानिक काँग्रेस अनुकूल

स्व. खा. वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Swapnil S

नांदेड : स्व. खा. वसंतराव चव्हाण यांच्या निधनानंतर लोकसभा पोटनिवडणूक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसोबतच होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

या बैठकीत लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्व. खा. वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांनाच उमेदवारी देण्यात यावी, या ठरावावर स्थानिक काँग्रेसचे एकमत झाले आहे. प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीच्या ठरावावर जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, माजी आ. ईश्वरराव भोसिकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी अनुमोदन देत ठराव संमत केला.

या बैठकीत लोकसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्व. खा. वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र प्रा. रवींद्र चव्हाण यांनाच उमेदवारी देण्यात यावी, या ठरावावर स्थानिक काँग्रेसचे एकमत झाले आहे. प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या उमेदवारीच्या ठरावावर जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, माजी आ. ईश्वरराव भोसीकर, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी अनुमोदन देत ठराव संमत केला.

यावेळी दिलीप पाटील बेटमोगरेकर, श्याम दरक, अनिल मोरे, जे. पी. पाटील, डॉ. रेखाताई चव्हाण, बाळासाहेब रावणगावकर, महेश देशमुख, अब्दुल गफार, अजिज कुरेशी, सुभाष किन्हाळकर आदीसह इतर काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

GST आता फक्त ५ आणि १८ टक्के; नवीन दराचा ‘घट’ २२ सप्टेंबरपासून

शिखर धवनला ED कडून समन्स; दोषी आढळल्यास माजी क्रिकेटपटूवर काय कारवाई होणार?

मराठा आरक्षणाच्या जीआरवरून OBC नेत्यांमध्ये मतमतांतरे; जीआर प्रत फाडत लक्ष्मण हाके यांचे आंदोलन; भुजबळांचा कोर्टात जाण्याचा इशारा

मुंबईची वाढती तहान भागवायला आणखी दोन धरणांचा प्रस्ताव

सुप्रीम कोर्टाची राज्य सरकारला नोटीस; कॉ. पानसरे यांच्या कुटुंबीयांच्या याचिकेवर निर्देश