लोणावळा-कर्जत घाटमार्गातील तिसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण; मध्य रेल्वेकडून मुदतपूर्व काम पूर्ण 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

लोणावळा-कर्जत घाटमार्गातील तिसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण

दुरुस्तीनंतर या मार्गिकेवरून पहिली ‘बँकर’ रेल्वे इंजिन चाचणी यशस्वी आणि सुरक्षितपणे पार झाली, ज्यामुळे रुळांच्या दुरुस्तीचे काम यशस्वी पूर्ण झाल्याचे सिद्ध झाले.

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेने सोमवारी लोणावळा-कर्जत घाट विभागातील खंडाळा आणि मंकी हिल दरम्यानच्या ‘अप साऊथ ईस्ट’ या तिसऱ्या मार्गिकेची दुरुस्ती अंदाजित वेळेआधीच पूर्ण करून एक महत्त्वाचा टप्पा गाठला. या दुरुस्तीनंतर या मार्गिकेवरून पहिली ‘बँकर’ रेल्वे इंजिन चाचणी यशस्वी आणि सुरक्षितपणे पार झाली, ज्यामुळे रुळांच्या दुरुस्तीचे काम यशस्वी पूर्ण झाल्याचे सिद्ध झाले.

७ जुलैपासून घाटातील या मार्गिकेचे नुकसान झाल्यामुळे मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रतिकूल हवामान आणि आव्हानात्मक डोंगराळ भागात रेल्वे अभियंते, तांत्रिक कर्मचारी आणि कामगारांनी दिवस-रात्र काम करून ही दुरुस्ती पूर्ण केली. बँकर इंजिनच्या यशस्वी धावेमुळे हा दुरुस्त केलेला रूळ रेल्वे वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याचे निश्चित झाले आहे.

वेळेआधीच पूर्ण झालेल्या या दुरुस्तीमुळे गर्दी आणि वाहतूककोंडी कमी होऊन मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील सेवा अधिक विश्वासार्ह होण्यास मदत होईल.

सेवा पूर्ववत होणार

या दुरुस्तीमुळे घाटातील रेल्वे वाहतुकीचा वेग वाढेल आणि विस्कळीत झालेली सेवा पूर्ववत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सातत्याने काम करणाऱ्या पथकांच्या प्रयत्नांमुळे हे काम पूर्ण झाल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; २९ ते ३१ जुलैदरम्यान जोर वाढण्याची शक्यता

कामगिरी सुधारा, अन्यथा बाजूला व्हा! निष्क्रिय मंत्र्यांना एकनाथ शिंदेंचा इशारा

व्हिडीओचा नव्हे, 'दिल का अँगल' बदला; प्रियांकांचा मोदींना खोचक सल्ला, परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा

कठोर कारवाई नको! दिल्ली आंदोलनप्रकरणी 'सर्वोच्च' दिलासा; १८ वर्षांखालील मुलांची तत्काळ सुटका करण्याचे निर्देश

Nashik : शालार्थ आयडी घोटाळा; संजय गरुड याला अटक