महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री फडणवीसांसमोर बेरोजगार तरुणांची जोरदार घोषणाबाजी

नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन फडणवीस यांनी केले.

वृत्तसंस्था

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने रोजगाराची मोठी संधी राज्याने गमावली. त्यातच राज्यातील विविध विभागातील नोकरभरती रखडल्याने तरुणांमध्ये प्रचंड रोष आहे. या रोषाचा सामना शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त फडणवीस नांदेडमध्ये आले असताना एका कार्यक्रमादरम्यान तरुणांनी त्यांच्यासमोर जोरदार घोषणाबाजी केली. ‘पोलीस भरती झालीच पाहिजे’, ‘५० खोके, एकदम ओके’, अशा घोषणा तरुणांनी यावेळी दिल्या. यावेळी आक्रमक झालेल्या तरुणांवर पोलिसांनी लाठीमार केला.

नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन फडणवीस यांनी केले. या कार्यक्रमानंतर फडणवीस सभागृहाबाहेर येत असतानाच तरुणांनी फडणवीसांना घेराव घालण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली. त्यामुळे घटनास्थळी गोंधळ निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांनी लाठीमार करत तसेच, काही जणांना ताब्यात घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

Mumbai : आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची गर्दी; शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, VIDEO

"आशाताई - दि लास्ट एम्परर"; ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर राज ठाकरेंची भावनिक पोस्ट

Mumbai : बनावट MGL कर्मचाऱ्याचा भांडाफोड; भांडुपमध्ये नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला, VIDEO

राज्यात अनेक धरणांवर भूकंप मापन यंत्रच नाही; जलसंपदा विभागाची उदासीनता उघड

"तुमच्यासाठीही साडी आणते…"; डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितल्या आशा भोसले यांच्या मिश्किल स्वभावाच्या खास आठवणी