महाराष्ट्र

सांगलीनंतर भिवंडीवरून मविआत वाद उफाळला; काँग्रेसमध्ये बंडखोरीची चिन्हे स्थानिक पदाधिकाऱ्यांत नाराजी

सांगलीत ठाकरे गटाच्या शिवसेनेने सर्वांना विचारात न घेता उमेदवार जाहीर केला. ही जागा काँग्रेसची असून, काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील ही निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु येथे परस्पर शिवसेनेचा उमेदवार मैदानात उतरविला, असा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे.

Swapnil S

विशेष प्रतिनिधी/मुंबई

महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेत सांगलीच्या जागेवरून टोकाचा वाद निर्माण झालेला असताना आता भिवंडीतही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला आहे. भिवंडीत राष्ट्रवादीने सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्यामामा यांना मैदानात उतरविले आहे. त्यामुळे काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, येथील काँग्रेस नेते दयानंद चोरगे यांनी बंडखोरीची तयारी केली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील वाद उफाळून आला आहे.

सांगलीत ठाकरे गटाच्या शिवसेनेने सर्वांना विचारात न घेता उमेदवार जाहीर केला. ही जागा काँग्रेसची असून, काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील ही निवडणूक लढण्यास इच्छुक होते. परंतु येथे परस्पर शिवसेनेचा उमेदवार मैदानात उतरविला, असा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे. यावरून तडजोडीचा मार्ग काढण्यात येत आहे. मात्र, अद्याप याला यश आले नाही, तर उलट काँग्रेस आणि शिवसेनेत दरी वाढत चालली आहे. ही दरी कमी करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत सांगलीत गेले आहेत. मात्र, काँग्रेस नेते आक्रमक झाले असून, सांगलीच्या जागेवर ठाम आहेत. त्यामुळे आता शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. राऊत यांनी काँग्रेसचे विमान गुजरातला जाऊ नये, असा इशारा दिला, तर विश्वजित कदम यांनी सांगलीबद्दल जनावराला जरी विचारले तरी हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे सांगितले जाईल, असे म्हटले. एवढेच नव्हे, तर कदम यांनी मविआला तडा जाईल असे राऊत यांनी बोलू नये, असा इशाराही दिला. त्यामुळे हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.

दुसरीकडे आता भिवंडीवरूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीत वाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादीने सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. त्यावर काँग्रेस नेते, पदाधिकाऱ्यांनी पैसेवाल्यांना उमेदवारी द्यायची असेल, तर आम्ही काम करणार नाही, असे म्हटले आहे. एवढेच नव्हे, तर आम्हाला वरून आदेश आला तरी आम्ही राष्ट्रवादीचे काम करणार नाही. आम्ही तत्काळ राजीनामा देऊ, असा इशारा देण्यात आला आहे.

राष्ट्रवादीचे काम करणार नाही

काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरगे यांनी तर थेट बंडखोरीचे संकेत दिले आहेत. आमचा विरोध असतानाही राष्ट्रवादीने येथे उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे पदाधिकाऱ्यांत नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे काम करणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

काँग्रेसचे लक्ष केवळ दलालीवर

समाजवादी पक्ष तर दर तासाला उमेदवार बदलत आहे, अशी टीकाही केली. काँग्रेसने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या निवडणूक जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा प्रभाव जाणवत आहे. पक्षावर डाव्या विचारांच्या पक्षांचा पगडा आहे, असेही मोदी म्हणाले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी