महाराष्ट्र

ऑल द बेस्ट! आजपासून बारावीची परीक्षा; गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेस राज्यात मंगळवारपासून प्रारंभ होत आहे.

Swapnil S

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेस राज्यात मंगळवारपासून प्रारंभ होत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, ठरावीक विषयांसाठी कॅल्क्युलेटरची परवानगी दिली आहे. मात्र, कॅल्क्युलेटर, मोबाइल किंवा इतर कुठलेही यंत्र विद्यार्थ्यांकडे असल्यास कारवाई केली जाणार आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकारांच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा ११ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.

परीक्षेसाठी १५ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी

या परीक्षेसाठी एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. त्यामध्ये ८ लाख १० हजार ३४८ मुले, ६ लाख ९४ हजार ६५२ मुली व ३७ ट्रान्सजेंडर आहेत. एकूण १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून, या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये विज्ञान शाखेचे सर्वाधिक ७ लाख ६० हजार ४६ विद्यार्थी सहभागी होणार आहेत. कला शाखेचे ३ लाख ८१ हजार ९८२, वाणिज्य ३ लाख २९ हजार ९०५, वोकेशनल ३७ हजार २२६, तर आयटीआयचे ४ हजार ७५० विद्यार्थी आहेत.

परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपण येऊ नये म्हणून विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर विद्यार्थ्यांना १० मिनिटे वेळ वाढवून देण्यात येणार आहे. परीक्षेच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी राज्यात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. याशिवाय राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्र परिसरामध्ये जिल्हा प्रशासनामार्फत ड्रोन कॅमेराद्वारे परीक्षा केंद्राची टेहळणी करण्यात येणार आहे. तसेच परीक्षा केंद्राच्या बाहेर जिल्हा प्रशानामार्फत व्हिडीओ चित्रीकरण करण्यात येईल. सकाळच्या सत्रात १०.३० वाजता, तर दुपारच्या सत्रात होणाऱ्या परीक्षांसाठी २.३० पर्यंत विद्यार्थी परीक्षा केंद्रावर उपस्थित असला पाहिजे. प्रचलित पद्धतीप्रमाणे माहिती तंत्रज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाइन घेतली जाणार आहे. या विषयासाठी १ लाख ९४ हजार ४३९ विद्यार्थ्यांची नोंद करण्यात आली असल्याची माहिती शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली