महाराष्ट्र

पंतप्रधान मोदी, राहुल गांधी आज महाराष्ट्रात

Maharashtra assembly elections 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच, आता प्रचार आणि सभांना वेग आला आहे.पुण्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत, तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बुलढाणा आणि गोंदिया येथे सभा होणार आहेत.

Swapnil S

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच, आता प्रचार आणि सभांना वेग आला आहे. राज्यातील तसेच देशातील प्रमुख नेत्यांच्या सभा ठिकठिकाणी आयोजित केल्या जात आहेत. पुण्यातील भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळवारी पुणे दौऱ्यावर येणार आहेत, तर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बुलढाणा आणि गोंदिया येथे सभा होणार आहेत. पुण्यातील टिळक रस्त्यावरील एस. पी. महविद्यालयाच्या मैदानावर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार आहे. पंतप्रधानपदी असताना पुण्याला सर्वाधिक वेळा भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. त्यांनी दहा वर्षांत तब्बल सहा वेळा पुण्याला भेट दिली आहे. मंगळवारचा त्यांचा सातवा दौरा आहे. पंतप्रधान असताना पंडित जवाहरलाल नेहरू ४ वेळा, इंदिरा गांधी ३ वेळा, तर राजीव गांधी २ वेळा पुण्यात आले होते. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार त्यांच्या बुलढाणा आणि गोंदिया येथे सभा होतील. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी तसेच गोंदिया येथील काँग्रेसचे उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्या प्रचारासाठी त्यांच्या सभा होणार आहेत. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने छत्रपती संभाजी नगरमध्ये आगमन होईल. तिथून ते हेलिकॉप्टरने चिखली येथे पोहोचतील. दुपारी १२ वाजता ते सभेला संबोधित करतील. त्यानंतर दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी ते गोंदिया येथे प्रचारसभेला संबोधित करतील व संध्याकाळी ४.५० वाजता गोंदियाहून दिल्लीकडे प्रयाण करतील.

योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात

मुंबई : महाराष्ट्र काबीज करण्यासाठी भाजपने राज्यातील नेत्यांसह केंद्रीय नेतृत्व प्रचारात उतरले आहे. तर यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मंगळवारी महाराष्ट्रातील अकोला, अमरावती आणि नागपूर दौऱ्यावर येणार आहेत. दुपारी २ वाजता अकोला, दुपारी ३.३० अमरावती आणि ६.३० वाजता नागपूर येथे जाहीर सभा होणार आहेत.

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ