संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

निवडणुकीत साथ द्या! अखेरच्या सभेत अजित पवार झाले भावूक

Maharashtra assembly elections 2024 : आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मी बारामतीकरांच्या सदिच्छा घ्यायला आलो आहे.

Swapnil S

बारामती : आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार या नात्याने मी बारामतीकरांच्या सदिच्छा घ्यायला आलो आहे. तुम्ही मला ७ वेळा निवडून दिलेत, आता आठव्यांदा निवडून मला साथ द्या, असे आवाहन करताना अजित पवार भावूक झाले. टेक्स्टाईल पार्कमधील प्रतिभा पवार यांच्याबाबत घडलेल्या प्रकारावर अजित पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले, त्यांनी पूर्ण माहिती घेऊन बोलले पाहिजे. त्याचे राजकारण करू नये.

मी मागे एकटा पडलो होतो

लोकसभा निवडणुकीत मी मागे एकटा पडलो होतो, यावेळी माझी आई माझ्यासोबत आहे. माझ्या बहिणी माझ्यासाठी फिरत आहेत. माझ्या पोटच्या पोरांनी तर माझ्यासाठी फिरलेच पाहिजे. माझी बायकोही फिरतेय, तिने तर माझ्यासोबत असलेच पाहिजे. कारण, लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांना राज्यसभा दिली, असे अजित पवार म्हणाले.

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ