संग्रहित छायााचित्र 
महाराष्ट्र

...तर मराठा समाजामध्ये फूट पडली असती - जरांगे

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असती तर मराठा समाजामध्ये फूट पडली असती, अशी स्पष्टोक्ती मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी येथे केली.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असती तर मराठा समाजामध्ये फूट पडली असती, अशी स्पष्टोक्ती मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बुधवारी येथे केली. मराठा समाज विधानसभेच्या निवडणुकीत राजकीय चित्र बदलू शकतो, असा दावाही जरांगे यांनी केला आहे.

जरांगे यांनी यापूर्वी कोणत्या मतदारसंघातील उमेदवारांना विजयी करावयाचे आणि कोणत्या उमेदवारांना पाडावयाचे हे निश्चित केले होते. मात्र, आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार उतरविणार नाही अथवा कोणालाही पाठिंबा देणार नसल्याचे त्यांनी सोमवारी स्पष्ट केले.

जे उमेदवार आमच्याकडून पाठिंब्याची अपेक्षा करतील त्यांना आम्ही मराठा आरक्षणाबाबतचा मसुदा देऊ, त्यानंतर पुन्हा एकत्र बसून कोणाला पाठिंबा द्यावयाचा त्याचा निर्णय घेऊ. अखेरच्या टप्प्यात राजकीय वातावरण बदलण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे, ताकदवान उमेदवार कोण आहे ते पाहून कोणत्या उमेदवाराला मसुदा द्यावयाचा आणि पाठिंबा द्यावयाचा याचा निर्णय घेण्यात येईल, असेही जरांगे म्हणाले.

मराठा समाजाला आधीच लक्ष्य करण्यात आले आहे, आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली असती तर मराठा समाजामध्ये फूट पडली असती. निवडणुकीतून माघार घेतल्याचा लाभ विरोधी महाविकास आघाडीला होईल, असे विचारले असता जरांगे म्हणाले की, अशा प्रकारची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे.

मराठा आंदोलन जिवंत

भविष्यातील रणनीतीबाबत विचारले असता जरांगे म्हणाले की, निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा निर्णय घेतल्याने काही इच्छुक नाराज झाले असतील, मात्र या निर्णयामुळे आपण मराठा आरक्षण आंदोलन जिवंत ठेवले आहे. निवडणुका हा अल्पावधीचा आनंद असतो आणि तो टाळला पाहिजे. मतदानाला काही दिवस बाकी असल्याने कोणत्या उमेदवाराचा पराभव करावयाचा त्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल, असे ते म्हणाले.

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ