महाराष्ट्र

‘बटेंगे तो कटेंगे’वरून दोन उपमुख्यमंत्री आमनेसामने

Maharashtra assembly elections 2024 : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'वरून राज्यातील सत्तारूढ महायुतीमध्येच दोन तट पडल्याचे पाहावयास मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा अर्थ समाजाला एकत्र ठेवणे असा असल्याचे म्हटले असतानाच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केला आहे.

Swapnil S

मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बटेंगे तो कटेंगे'वरून राज्यातील सत्तारूढ महायुतीमध्येच दोन तट पडल्याचे पाहावयास मिळत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा अर्थ समाजाला एकत्र ठेवणे असा असल्याचे म्हटले असतानाच दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोध केला आहे, तर फडणवीस यांच्या पक्षातील सहकारी पंकजा मुंडे यांनी या घोषणेची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार आणि पंकजा मुंडे यांना जनतेच्या भावना समजल्या नसतील किंवा त्यांना योगी यांच्या वक्तव्याचा अर्थच कळला नसेल किंवा प्रसारमाध्यमांनी काहीतरी वेगळाच अर्थ घेतला असेल. अजित पवार आणि पंकजा मुंडे हे योगींशी असहमत असण्यामागे यापैकी एखादे कारण असू शकते, अशी सारवासारव फडणवीस यांना करावी लागली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वादंग आहे. योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान ‘बटेंगे तो कटेंगे’ अशी घोषणा देत जनतेला सावधानतेचा इशारा दिला होता. त्यानंतर आदित्यनाथ यांच्यावर टीका सुरू झाली. मात्र भाजप नेत्यांनी व शिवसेनेच्या (शिंदे) नेत्यांनीदेखील योगींचा हा नारा उचलून धरला आहे, तर महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने मात्र ते या घोषणेशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाठोपाठ भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील अशा घोषणेची आवश्यकता नसल्याचे नमूद केले आणि त्यानंतर घूमजाव केले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक हैं तो सेफ हैं’ असा नारा दिला. मात्र, या दोन घोषणांमुळे महायुतीत जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

अजित पवारांना वेळ लागेल : फडणवीस

वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस म्हणाले की, अजित पवारांबद्दल बोलायचे झाल्यास ते गेल्या अनेक दशकांपासून अशा विचारांच्या लोकांबरोबर राहिले आहेत जे स्वतःला सेक्युलर (धर्मनिरपेक्ष) म्हणवून घेत आले आहेत. त्यांची विचारसरणी धर्मनिरपेक्ष असल्याचे सांगत आले आहेत. परंतु, त्यांचे धर्मनिरपेक्ष असणे म्हणजे हिंदूविरोधी असण्यासारखे आहे. हिंदुत्वाचा विरोध म्हणजेच धर्मनिरपेक्षता अशी विचारधारा असलेल्या लोकांबरोबर अजित पवार गेल्या अनेक वर्षांपासून राहिले आहेत. त्यामुळे जनतेचा कल समजून घेण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागेल.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा