महाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

Rakesh Mali

गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 2023 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानामुळे त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. तसेच, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले आहे.

"अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे, तर गंभीर स्वरुपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छटांचे दर्शन आपल्याला अभिनयातून घडवले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले", असे मुख्यमंत्र्यांनी त्याचे अभिनंदन करताना म्हटले.

अशोक सराफ यांचा जन्म 4 जून 1947 रोजी झाला. त्यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात, मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये काम केले आहे. विनोदी भूमिका साकारण्यात सराफ यांचा हातखंडा असल्याने बहुतांश मालिका, चित्रपट आणि नाटकात ते विनोदी पात्र साकारताना दिसले. सिनेसृष्टीत त्यांना मामा या नावानेही ओखळले जाते.

बँकेत नोकरी ते मराठी सिनेसृष्टीतला दिग्गज अभिनेता-

अशोक सराफ सिनेसृष्टीत येण्यापूर्वी बँकेत काम करत होते. त्यांना आधीपासूनच अभिनयाची आवड होती, पण वडिलांचा शब्द पाळत त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी सुरू केली. नोकरी करत असताना ते आपला छंद जोपासत नाटकातही काम करू लागले आणि इंडस्ट्रीतील स्टार कलाकार म्हणून नावारुपास आले.

1969 पासून सिनेसृष्टीत-

अशोक सराफ यांनी 1969 पासून सिनेसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी आतापर्यंत 250 हून अधिक मराठी चित्रपटात काम केले आहे. यापैकी बहुतांश चित्रपट लोकप्रिय ठरले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल