राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ 
महाराष्ट्र

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून कर्मचाऱ्यांना होळीची भेट दिली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के इतका झाला आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे जुलै २०२५ पासून लागू होईल.

Swapnil S

मुंबई : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून कर्मचाऱ्यांना होळीची भेट दिली आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ५५ टक्क्यांवरून ५८ टक्के इतका झाला आहे. महागाई भत्त्यातील ही वाढ पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे जुलै २०२५ पासून लागू होईल.

वित्त आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी बुधवारी विधान परिषदेत महागाई भत्त्यात वाढ करण्याच्या निर्णयाची माहिती निवेदनाद्वारे दिली. वाढीव महागाई भत्ता फेब्रुवारी २०२६ पासून रोखीने देण्यात येणार असून, जुलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकीची रक्कम गुढीपाढव्याच्या निमित्ताने मार्च २०२६ मध्ये देण्यात येईल. तर नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीतील थकबाकीसंदर्भात आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील सुमारे ५ लाख १६ हजार शासकीय कर्मचारी तसेच सुमारे ८ लाख ७२ हजार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार असल्याचेही जयस्वाल म्हणाले.

लोकप्रतिनिधींच्या वेतनात ५० टक्के कपात करा! महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाची मागणी

BEST समितीच्या बैठकीत नाराजीनाट्य; सत्ताधारी व विरोधक बैठकीतून बाहेर गेले

डिजिटल माध्यमातून सिनेमा पाठवला तरी तो सॉफ्टवेअर नाही! धर्मा प्रॉडक्शनला हायकोर्टाचा दिलासा

एसटीमध्ये NCMC कार्ड अनिवार्य; १ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट कार्डद्वारेच मिळणार

विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरचे काम मार्च २०२७ पासून सुरू; MSRDC चे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार गायकवाडांची ग्वाही