महाराष्ट्र

जीएसटी संकलनात महाराष्ट्र अव्वल!

राज्यात इतक्या कोटींची जीएसटी संकलन करण्यात आले

वृत्तसंस्था

ऑक्टोबर महिन्यातील ‘वस्तू आणि सेवा कर’ अर्थात जीएसटी संकलनात महाराष्ट्राने नेहमीप्रमाणेच अग्रस्थान पटकावले आहे. देशभरातून ऑक्टोबरमध्ये सुमारे दीड लाख कोटीहून अधिक जीएसटी संकलन झाले असून, राज्यातून २३ हजार ०३७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

सप्टेंबर महिन्यात राज्यातून २१ हजार ४०३ कोटी रुपयांचे संकलन करण्यात आले होते. त्यात ऑक्टोबर महिन्यात १६३४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर असून, दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे. कर्नाटकमध्ये ऑक्टोबर महिन्यात एकूण १० हजार ९९६ कोटींचे जीएसटी संकलन झाले आहे.

“राज्याच्या जीएसटी संकलनात वाढ झाली, याचाच अर्थ आपली अर्थव्यवस्था वेगाने सुधारत असल्याचे हे द्योतक आहे. मुंबईतून सर्वाधिक जीएसटी जमा झाला असून, अन्य शहरांमध्येही जीएसटी संकलनात वाढ होत आहे. सध्या सणासुदीच्या काळात लोकांनी केलेल्या खरेदीमुळेही जीएसटी संकलनात वाढ झाली आहे,” असे राज्याच्या वित्त विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक