महाराष्ट्र

विधान परिषदेची पोटनिवडणूक : महायुती उमेदवारांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांवर महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पाचपैकी तीन जागांवर भाजप, प्रत्येकी एक एक जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका उमेदवाराला संधी मिळाली आहे.

Krantee V. Kale

मुंबई : विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांवर महायुतीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. पाचपैकी तीन जागांवर भाजप, प्रत्येकी एक एक जागेवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या एका उमेदवाराला संधी मिळाली आहे. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना भाजपने संधी दिली असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने संजय खोडके यांना उमेदवारी दिली आहे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने नंदुरबार येथील चंद्रकांत रघुवंशी यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, पाच जागांसाठी मविआने उमेदवार रिंगणात उतरवला नसल्याने पाचही उमेदवारांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाचपैकी तीन जागांवर संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने ही तिघांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. पाच पैकी तीन जागा भाजपच्या वाट्याला आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उर्वरित दोन जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. 

नंदुरबार येथील चंद्रकांत रघुवंशी यांना एकनाथ शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केली. तर विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून संजय खोडके यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

संजय खोडके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला.

महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव

Gen-Z पुढे अखेर नेपाळ सरकार कोसळलं; 'या' दोन मिलेनियल नेत्यांनी नेपाळचे पालटले चित्र

नेपाळमध्ये परिस्थिती चिघळली! PM पाठोपाठ राष्ट्रपतींचाही राजीनामा; आंदोलकांनी परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्र्यांसह माजी PM ना पळवून पळवून मारले

GenZ Protests : नेपाळमध्ये वातावरण तापले; पंतप्रधान ओलींचा राजीनामा, आंदोलकांसमोर अखेर माघार

करिश्मा कपूरच्या मुलांची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; वडिलांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये वाट्याची मागणी