महाराष्ट्र

पोलिसांसाठी ३ नवीन रुग्णालयांत वैद्यकीय तपासणीची सुविधा; राज्य सरकारचा निर्णय

सणासुदीचे दिवस असो वा आपत्कालीन परिस्थिती असो पोलीस २४ तास ऑन ड्युटी असतात. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना आरोग्य तपासणीत अडचण येऊ नये यासाठी तीन नवीन रुग्णालय उपलब्ध करण्यात आली आहेत.

Swapnil S

मुंबई : सणासुदीचे दिवस असो वा आपत्कालीन परिस्थिती असो पोलीस २४ तास ऑन ड्युटी असतात. त्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना आरोग्य तपासणीत अडचण येऊ नये यासाठी तीन नवीन रुग्णालय उपलब्ध करण्यात आली आहेत. नाशिक, वाशी व मुंबईत अंधेरी पूर्व येथील रुग्णालयात वैद्यकीय तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

वय वर्षे ४० ते ५० या वयोगटातील गृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना दोन वर्षांतून एकदा व वय वर्षे ५१ व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी बंधनकारक आहे. वैद्यकीय तपासणीसाठी ५ हजार रुपये या प्रमाणे खर्चाची प्रतिपूर्ती गृह विभागातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी यांना अदा करण्याबाबत ‘अपवादात्मक बाब’ म्हणून सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून करण्यात येते. गृह विभागातील पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी मुंबई व कोकण विभागासाठी तीन नवीन रुग्णालयांचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

या ३ रुग्णालयांत होणार वैद्यकीय तपासणी

- अपोलो क्लिनिक, वाशी

- अपोलो क्लिनिक, अंधेरी (पूर्व)

- अपोलो क्लिनिक, नाशिक

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था