Photo : X (@AjitPawarSpeaks)
महाराष्ट्र

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी राजपत्रित अधिकाऱ्यांचा पुढाकार; दीड लाख अधिकारी देणार एक दिवसाचे वेतन

मराठवाडा, बीड आणि अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीमुळे शेतपिकांसह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. मदतीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने राज्यातील दीड लाख अधिकाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मराठवाडा, बीड, अहिल्यानगर जिल्ह्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकासह घरांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने पुढाकार घेतला आहे. राज्यातील दीड लाख राजपत्रित अधिकाऱ्यांचे सप्टेंबर महिन्याचे एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाला देण्याचा निर्णय घेतल्याचे महासंघाच्या वतीने सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टीमुळे शेतीचे तसेच नागरिकांचे अपरिमित नुकसान झालेले आहे. या आपद्ग्रस्त स्थितीमध्ये शासनप्रमुख प्रभावी उपाययोजना आखत आहेत. राज्यावरील या अस्मानी संकटाला एकजुटीने तोंड देण्यासाठी राज्य शासनाला महाराष्ट्रातील राजपत्रित अधिकाऱ्यांची देखील समर्थ साथ राहील, याची ग्वाही अधिकारी महासंघाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांना बुधवारी पाठविलेल्या पत्रान्वये दिली आहे.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत