महाराष्ट्र

Maharashtra Rain : पुढील दोन आठवडे राज्यात पाऊस

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील दोन आठवडे जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाची सरासरीपेक्षा अधिक तीव्रता नोंदवली गेली असून, काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Swapnil S

पुणे : हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात पुढील दोन आठवडे जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. सध्या राज्याच्या अनेक भागात पावसाची सरासरीपेक्षा अधिक तीव्रता नोंदवली गेली असून, काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अंदाजानुसार, २१ सप्टेंबरपर्यंत राज्यात कमी-जास्त प्रमाणात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

हवामान विभागाचा पुढील १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान तळकोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थोडा अधिक पाऊस राहू शकतो. २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान दक्षिण मध्य महाराष्ट्र वगळता इतर भागांमध्ये जोरदार पाऊस; विशेषतः कोकण किनारपट्टीवर सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

गुरुवारी दुपारनंतर पुण्याला पावसाने पुन्हा झोडपले. दिवस ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर पावसाची तीव्रता वाढल्याने पुणेकरांची दैना उडाली. सखल भागात पाणी साठले. हवामान विभाग नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहे, तसेच पावसाळी वाहतुकीमध्ये सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

पुढील चार दिवस राज्यात यलो अलर्ट

शुक्रवारी उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राचा आणि मराठवाड्याचा काही भाग, उत्तर विदर्भाचा काही भाग, शनिवारी, रविवारी सोलापूर, दक्षिण मराठवाडामध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.

­­‘ऑल आऊट ५०००’ फटाक्याचा आवाज सर्वाधिक; १११.८ डेसिबलची नोंद, फटाक्यांची चाचणी, ‘कुरवी चिमणी’चा आवाज सर्वांत कमी

तळोजा-खारघरच्या पाणीटंचाईवर सिडकोला सात दिवसांचा अल्टिमेटम; मार्च २०२७ पर्यंत तळोजा टँकरमुक्त करण्याचे आश्वासन

Bengaluru Mass Murder : कॅब चालकाचे भयंकर कृत्य; पत्नीसह सासरच्या सहा जणांची वरवंट्याने ठेचून निर्घृण हत्या

उल्हासनगर : दिवाळीच्या खरेदीला पार्किंगचे ग्रहण; ग्राहक हैराण, बाजारपेठांत तुफान गर्दी

Thane : दिवाळीच्या शुभेच्छापत्रासोबत गोमातेसाठी ११ किलो चारा! QR कोडद्वारे चारा वितरणाची माहिती आणि छायाचित्रे मिळणार