महाराष्ट्र

महाराष्ट्र निवासी डॉक्टरांचा संप मागे ; मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय

निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला महाराष्ट्र निवासी डॉक्टरांचा संप मागे घेण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याशी आज संपकरी निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने मागण्यांबाबत चर्चा केली. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी गिरीश महाजन म्हणाले की, निवासी डॉक्टरांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत.

वसतिगृहासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनापूर्वी मला भेटा असेही मी त्यांना सांगितले होते, बैठक आधी झाली असती तर हा प्रश्न निर्माण झाला नसता, असेही गिरीश महाजन म्हणाले. निवासी डॉक्टरांचे प्रतिनिधी डॉ.अविनाश दहिफळे यांनी सांगितले की, आज आमच्यात सकारात्मक चर्चा झाली. आम्ही संप मागे घेत आहोत. निवासी डॉक्टरांचा संप आता मागे घेण्यात आला आहे. आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी मार्डने प्रशासन आणि सरकारसमोर आपल्या मागण्या मांडताना संपावर जाण्याची धमकी दिली होती. सरकारने ३१ जानेवारीपर्यंत चर्चा करून मागण्यांवर निर्णय घ्यावा, अशी मागणी निवासी डॉक्टरांनी केली होती. मात्र, त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे निवासी डॉक्टरांनी २ जानेवारीपासून संप पुकारला होता.निवासी डॉक्टरांच्या संपामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयातील रुग्णांचे हाल होत होते. राज्य सरकारशी आज चर्चा न झाल्यास बुधवारपासून संपावर जाण्याचा इशारा आपत्कालीन विभागातील कर्तव्यावर असलेल्या निवासी डॉक्टरांनी दिला होता.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव