छगन भुजबळ संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

महाराष्ट्र सदन घोटाळा : छगन भुजबळांना तुर्तास दिलासा

महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला.

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात अजित पवार गटाचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला. छगन भुजबळ व कुटुंबियांना दोषमुक्त करण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया यांच्या याचिकेवर न्या. शिवकुमार डिगे यांच्या न्यायालयाने सुनावणी २८ एप्रिलला निश्चित केली. सरकारी वकील गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने सुनावणी तहकूब केली.

बुधवारी सुनावणीच्यावेळी घोटाळ्यात आरोपी असलेल्या माजी प्रधान सचिवांतर्फे अॅीड. गिरीश कुलकर्णी यांनी याचिकेलाच आक्षेप घेतला. या प्रकरणात अंजली दमानिया मूळ तक्रारदार नाहीत किंवा साक्षीदारही नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना भुजबळ कुटुंबीयांच्या दोषमुक्ततेला आव्हान देण्याचा हक्क आहे की नाही, असा मुद्दा उपस्थित केला.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत