(संग्रहित छायाचित्र)
(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

ऑल द बेस्ट! आजपासून दहावीची परीक्षा

Swapnil S

पुणे : शालेय विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी दहावीची परीक्षा (राज्य मंडळ) १ ते २६ मार्च या कालावधीत होणार आहे. परीक्षेसाठी १६ लाख ९ हजार ४४५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विविध उपाययोजना राज्य मंडळाने केल्या आहेत. राज्यात २७१ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. निवडणूक आचारसंहिता लागली, तरी परीक्षेवर फारसा परिणाम होणार नाही.

राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मंडळाच्या सचिव अनुराधा ओक, माणिक बांगर यावेळी उपस्थित होत्या. परीक्षेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी राज्य मंडळ स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उत्तरपत्रिकेची गोपनियता राहण्यासाठी सहाय्यक परीरक्षक पथक म्हणून परीक्षा केंद्रावर कार्यरत राहतील. तसेच प्रश्नपत्रिकांची गोपनीय पाकिटे ताब्यात घेतल्यापासून वितरीत करेपर्यंतचे चित्रीकरण करण्यात येईल. सहाय्यक परीरक्षक यांनी त्यांच्या मोबाईलचे जीपीएस सुरू ठेवणे आवश्यक आहे. राज्य मंडळाच्या भरारी पथकासह जिल्हास्तरावरही भरारी पथके नियुक्त केली आहेत. परीक्षेच्या वेळेनंतर दहा मिनिटे वाढवून देण्यात आली आहेत.

गेल्या वर्षी परीक्षेसाठी १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. त्यामुळे यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. यंदा सहा हजार खासगी आणि आठ हजार पुनर्परीक्षार्थी वाढले आहेत, असे गोसावी यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक असली, तरी निकाल वेळेत जाहीर केला जाईल, असे गोसावी यांनी स्पष्ट केले.

"ज्यावेळी पक्ष धोक्यात येतो तेव्हा ते काँग्रेसमध्ये जातात," फडणवीसांची शरद पवारांवर टीका...

कराडसह साताऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी: वादळी वाऱ्याने अनेक ठिकाणी मोठे नुकसान 

"उद्धव ठाकरे जेलमध्ये असतील..." अरविंद केजरीवाल नेमकं काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगरमध्ये राडा, क्रांती चौकात शिंदे-ठाकरे गट आमनेसामने

"शरद पवारांना ऑफर नव्हती, तो सल्ला होता..." नरेंद्र मोदींच्या वक्तव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण