टीईटी पेपरफुटीप्रकरणी सोलापूर कनेक्शन; स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवारला अटक  आरोपी प्रकाश पवार
महाराष्ट्र

TET पेपरफुटीप्रकरणी सोलापूर कनेक्शन; स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण केंद्र चालवणाऱ्या प्रकाश पवारला अटक

देशभर गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी सोलापूर येथून एका आरोपीला अटक केली आहे.

Krantee V. Kale

भिवंडी : देशभर गाजलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात भिवंडी पोलिसांनी सोलापूर येथून एका आरोपीला अटक केली आहे. प्रकाश धनसिंग पवार (४५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पवार हा सोलापूर येथे ‘ध्रुव अकॅडमी’ नावाने पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

पाच दिवसांची पोलिस कोठडी

या प्रकरणातील पवारची अटक ही १६ वी आहे. आरोपी प्रकाश पवार यास भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला १५ ऑगस्टपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे २६ विद्यार्थ्यांचे पेपर सापडले असून त्यापैकी २० उत्तीर्ण झालेल्यांचे पेपर आढळून आले. त्यापैकी ५ पेपर टीईटी उत्तीर्ण झालेल्यांचे असल्याचा संशय आहे.

महाराष्ट्रातील धागेदोरेही समोर येणार?

टीईटी पेपरफुटीप्रकरणी आतापर्यंत उत्तर प्रदेश, बिहार आणि हरयाणा येथून १५ जणांना अटक करण्यात आली होती. मात्र, महाराष्ट्रातील पेपरची विक्री नेमकी कोणाला करण्यात येणार होती, याचा तपास अद्याप सुरू होता. आता सोलापुरातून आरोपीला अटक झाल्याने या प्रकरणाचे महाराष्ट्रातील धागेदोरेही समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोलीस तपासात अटक आरोपी सोनू जितेंद्रसिंग याला प्रकाश पवारने काही विद्यार्थ्यांची कागदपत्रे दिल्याचे निष्पन्न झाले आहे. या कागदपत्रांचा नेमका वापर कशासाठी करण्यात आला, तसेच पवारचा या प्रकरणातील अन्य आरोपींशी काय संबंध आहे, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. आर्थिक गैरव्यवहारासह विद्यार्थ्यांची कागदपत्रे आणि गैरप्रकारांशी संबंधित अन्य बाबींचाही पोलिस तपास करत आहेत.

२८ जून रोजी महाराष्ट्रात टीईटीची परीक्षा होणार होती. मात्र ठाणे, भिवंडीत २७ जून रोजीच हा पेपर फुटला. परिणामी परीक्षा रद्द झाली.

AI बनतोय मुलांचा शिक्षण सहाय्यक; 'क्राय' संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

दहशतवादाचे आकलन नसल्याने द्विपक्षीय संबंधांवर परिणाम; भारत-अमेरिका संबंधांवर जयशंकर यांचे स्पष्ट वक्तव्य

Bhiwandi : टीईटी पेपरफुटी प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी

Mumbai : लालबागच्या राजाच्या प्रसादातून वीज निर्मिती; ४२ टन ओला कचरा जैविक प्रक्रियेत, रुग्णालयातील वॉर्डला मिळणार वीज

गणेशोत्सवाचा जल्लोष; साखरचौथीच्या गणरायाचे उत्साहात आगमन; उरण, पेण, मुरूडसह ग्रामीण भागात भक्तिमय वातावरण