आंबा-काजू उत्पादकांना १५ दिवसांत मिळणार भरपाई; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती 
महाराष्ट्र

आंबा-काजू उत्पादकांना १५ दिवसांत मिळणार भरपाई; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

कोकण विभागातील अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या आंबा तसेच काजू उत्पादक शेतकऱ्यांना पुढील १५ दिवसांत भरपाई देण्यात येईल अशी अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

Swapnil S

मुंबई : कोकण विभागातील अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामानामुळे नुकसान झालेल्या आंबा तसेच  काजू उत्पादक शेतकऱ्यांना पुढील १५ दिवसांत भरपाई देण्यात येईल अशी अशी माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुरुवारी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) अंतर्गत सुमारे २०९ कोटी रुपयांची मदत आणि  हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत सुमारे २१७ कोटी रुपयांची नुकसानभरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल असे ते म्हणाले.

कोकणातील  आंबाआणि  काजू उत्पादकांना नुकसानभरपाई देण्याबाबत  शिवसेना शिंदे गटाच्या निलेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना भरणे म्हणाले, कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांना नुकसानीपोटी एनडीआरएफच्या निकषांनुसार हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांप्रमाणे मदत देण्यात येणार असून, कोकण विभागासाठी २०९ कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. ही मदत लवकरच वितरित केली जाईल.

यावेळी कृषीमंत्र्यांनी कोकणातील शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या जिल्हानिहाय मदतीचा तपशील जाहीर केला.  ठाणे जिल्ह्यातील ४ हजार ६६९ शेतकऱ्यांसाठी ४ कोटी ८४ लाख रुपये, पालघरमधील १७ हजार ७१२ शेतकऱ्यांसाठी ६ कोटी ८३ लाख रुपये, रायगडमधील सुमारे १७ हजार शेतकऱ्यांसाठी २० कोटी २८ लाख रुपये, रत्नागिरीतील ५२ हजार ६२८ शेतकऱ्यांसाठी ९८ कोटी ४५ लाख रुपये तर सिंधुदुर्गमधील ४२ हजार ३२२ शेतकऱ्यांसाठी ७९ कोटी ५ लाख रुपयांची मदत प्रस्तावित करण्यात आल्याचे भरणे यांनी सांगितले.

Video : 'ही अटक नाही तर अपहरण'; सुटकेनंतर ध्रुव राठीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला - 'त्यांनी मला बेडरूममधून...

आजीच्या निधनानंतर अभिजीत दिपके गावी परतणार; 'CJP मागे हटणार नाही', पोस्टमधून स्पष्ट केली भूमिका

CJP Protest : 'सरकारने मोठी चूक केली'; अजिंक्य शिंदेंची आज मुंबईत आंदोलनाची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, Video

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

Mumbai : लोअर परळच्या देवीमूर्तीचा भव्य थाट; लालबागच्या राजाच्या सिंहासनाची खास झलक व्हायरल