महाराष्ट्र

मराठा समाजाला EWSमधून आरक्षण घेतल्यास जास्त फायदा होईल; प्रवीण गायकवाड यांचं मत

नवशक्ती Web Desk

राज्यातील मराठा समाजाला ओबीसींधून आरक्षण देण्याच्या मागणीवरुन राज्यात वातावरण तापलं असताना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी मराठा समाजाला महत्वाचं आवहान केलं आहे. राज्यातील मराठा समाजानं ओबीसीऐवजी ईडब्ल्यूएसमधून आरक्षण घेतलं तर अधिक फायदा होईल, असं प्रवीण गायकवाड यांनी म्हटलं आहे. सध्या ओबीसींना मिळणाऱ्या आरक्षणापैकी १८ ते १९ टक्के वाटा कुणबी समाज उचलतो. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसमध्ये आल्यास आरक्षणाचा खुपच कमी वाटा मराठा समाजाला मिळले असा मुद्दा प्रवीण गायकवाड यांनी मांडला आहे.

ते म्हणाले की, आर्थिक निकषावर मिळणाऱ्या १० टक्के आरक्षणापैकी ८ ते १० टक्के वाटा हा मराठा समाजाच्या वाट्याला येत असल्याचं दिसतंय. आर्थिक असमानता आरक्षण मागण्याचं मुळ आहे, असं गायकवाड म्हणाले. आर्थिक समस्या सोडवण्यासाठी सरकारने धोरणात बदल करण्याची गरज आहेस असं ते म्हणाले.

मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला मोठा प्रतिसाद देखील मिळाल्याच दिसत आहे. असं असताना. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला आहे. यावरुन मराठा आणि ओबीसी समाजाच्या नेत्यांमध्ये वाद-प्रतिवाद सुरु आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मराठा समुदायाने आर्थिकदृष्ट्या मागास घटकातून आरक्षण घेण्याची भूमिका मांडली आहे.

"राज ठाकरे महाराष्ट्रद्रोही नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मांडीला मांडी लावून बसत असतील तर...", संजय राऊतांची टीका

एसटी कामगारांच्या वेतनाचा मार्ग मोकळा; शासन निर्णय जारी : ८७ हजार कर्मचाऱ्यांना दिलासा

रविवारी तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांची होणार गैरसोय

आणखी एक आमदार शरद पवार गटात? अजित पवार यांना धक्का; झिरवळ यांची मविआच्या बैठकीत हजेरी

माझ्याकडे दोनच पर्याय, तुरुंग किंवा पक्ष बदलणे! शिंदे गटाचे उमेदवार रवींद्र वायकरांच्या गौप्यस्फोटाने खळबळ