महाराष्ट्र

Maratha Reservation : "नव्या जीआरमध्ये कुठलीही सुधारणा नाही", राज्य सरकारचा जीआर धुडकावत मनोज जरांगे उपोषणावर ठाम

आमच्यावर दाखल गुन्हे ताक्काळ मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी जरांगे यांनी केली आहे.

नवशक्ती Web Desk

जालन्यातील अंतरवाली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी अमरण उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या शिष्टमंडळाशी राज्य सरकारशी शुक्रवारी मुंबईत बैठक पार पडली. यानंतर मनोज जरांगे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशात जरांगे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शासनाने नव्या जीआरमध्ये कुठलीही सुधारणा केली नसल्याने मनोज जरांगे हे आपल्या उपोषणावर ठाम आहेत. माझं उपोषण सुरुचं राहणार असल्याचं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राज्य सरकारचं प्रय्तन पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे.

यावेळी आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजावर लाठीचार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अजुनही सक्तीची कारवाई करण्यात आली नाही. त्यांना फक्त सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. आमच्यावर गोळ्या झाडणारे अधिकारी शिष्टमंडळात फिरत आहेत. आमच्यावर दाखल गुन्हे ताक्काळ मागे घ्यावे, अशी मागणी यावेळी जरांगे यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी पाठवला नवा जीआर

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली. यात उपोषणकर्ते मनोज जरांगे यांचं देखील शिष्टमंडळ देखील उपस्थित होतं. यावेळी आरक्षणाच्या मुद्यावर चर्चा पार पडली. जरांगे यांनी पाठवलेल्या शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून घेऊन सरकारने काही बदल करण्यास सहमती दर्शवल्याची माहिती आहे. तसंच मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांना एक बंद पाकिटात जीआर देखील पाठवला. शिंदे गटाचे नेते अर्जून खोतकर हा लिफाफा घेऊन अंतरवाली सराटी या गावात दाखल झाले आहेत. हा नवा जीआर जरांगे यांना दिल्यानंतर त्यावर चर्चा पार पडली. यानंतर जरांगेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक