महाराष्ट्र

Maratha Reservation : सर्वपक्षीय बैठकीवर जरांगेंनी दिली प्रतिक्रिया; अजून किती वेळ हवा सरकारला? मांडला प्रश्न...

नवशक्ती Web Desk

मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आज मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय नेत्यांची बैठक पार पडली. आजच्या या बैठकीत ३२ जण उपस्थित होते. बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली होती .मनोज जरांगे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

आज झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर, इतर समाजावर अन्याय न होता मराठ्यांना आरक्षण मिळावं असं आमचं याबाबत सर्वांचं एकमत झालं असून मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोग युध्द पातळीवर काम करत आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला थोडा वेळ द्यावा, मराठा समाजाने संयम राखावा, मनोज जरांगे यांनी सरकारला सहकार्य करावे ही सर्वपक्षीय नेत्यांची भावना असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीनंतर बोलताना म्हणाले.

बैठकीत नक्की काय झालं याचा तपशील अजून आम्हला मिळाला नाही, गोरगरिबांच्या लेकरांकडे सरकारचं लक्ष नाही. सरकार फक्त बैठकाचं घेतं आहे. मराठा समाजाच्या लेकरांचे विनाकारण मुडदे पडत आहेत, तरी त्याकडे सरकार लक्ष देतं नाहीत. हा सगळा विषय हसण्यावारी नेतं आहेत. हे जनता सांभाळणारं सरकार म्हणायचं काय. गोरगरिबांच्या मुलांवर तुम्ही गुन्हे दाखल केले आहेत, असंही मनोज जरांगे म्हणाले. तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या. तुम्हाला आता वेळ कशासाठी पाहिजे आणि का पाहिजे? आणि महाराष्ट्रातील मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? हे सांगा. तुमच्या मनांत नक्की काय आहे ते आम्हला कळू द्या. असं मनोज जरांगे पाटील म्हटले आहेत.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस