महाराष्ट्र

मराठी अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन ; विनोदाच्या शैलीसाठी विशेष ओळख

वृत्तसंस्था

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या. त्यांचे 'मोरुची मावशी' हे नाटक प्रचंड गाजले. मराठीत लोकप्रिय झालेल्या काही विनोदी कलाकारांमध्ये प्रदीप पटवर्धन यांच्या नावाचा समावेश होतो. गिरगाव येथे राहणारे प्रदीप पटवर्धन यांनी महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान एकांकिका स्पर्धांमध्ये काम केले. अष्टपैलू अभिनेता म्हणून ओळखले जाणारे प्रदीप पटवर्धन नंतर व्यावसायिक नाटकांकडे वळले. 1985 मध्ये त्यांनी सुयोगच्या 'मोरूची मावशी' या नाटकात अभिनेता प्रशांत दामलेसोबत काम केले. या नाटकातील त्यांच्या भूमिकेमुळे त्यांना अभिनेता म्हणून खरी कीर्ती मिळाली. 'मोरूची मावशी' या नाटकाचे दोन हजारांहून अधिक प्रयोग त्यांनी केले. मराठी रंगभूमीवर अनेक दशकांपासून हाऊसफुल्ल असलेल्या 'मोरूची मावशी' या नाटकातील प्रदीप पटवर्धन यांची भूमिका खूप गाजली होती. याशिवाय त्यांनी 'नवरा माझा नवसाचा', 'चष्मे बहाद्दर', '1234', 'लावू का लाथ', 'भुताळलेला', 'नवरा माझा भवरा', 'डोम', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय' या चित्रपटातही भूमिका केल्या.

नव्वदच्या दशकात प्रशांत दामले, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर यांनी अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्यासोबत अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केले. प्रदीप पटवर्धन यांनी अभिनेता-दिग्दर्शक विजय पाटकर यांच्या चित्रपटातही काम केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. "मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारे सदाबहार अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रपट सृष्टीने एक महान कलाकार गमावला आहे." एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

भर सभेत रडले रोहित पवार...सुप्रिया सुळेंच्या प्रचारसभेत नेमकं काय घडलं?

घसा बसलेला असतानाही शरद पवारांनी केलं भाषण, सुप्रिया सुळेंची सांगता सभा गाजवली

भारतीय महिला ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानसह एकाच गटात; महिलांच्या टी-२० विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना जमावानं जीव जाईपर्यंत मारलं, नेमका कुठं घडला प्रकार?

कांदा निर्यातबंदी उठवली! ४० टक्के निर्यातकरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष कायम