‘मार्ड’चा आजपासून बेमुदत संप ANI
महाराष्ट्र

Kolkata Doctor Rape-Murder : ‘मार्ड’चा आजपासून बेमुदत संप; रुग्णांचे होणार हाल

कोलकातातील महिला डॉक्टरच्या बलात्कार व हत्येप्रकरणी महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे.

Swapnil S

मुंबई : कोलकातातील महिला डॉक्टरच्या बलात्कार व हत्येप्रकरणी महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) मंगळवारपासून बेमुदत संपावर जाण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णालयातील रुग्णांचे हाल होणार आहेत.

‘मार्ड’ने निवेदनात सांगितले की, राज्यातील सर्व रुग्णालयांत सर्व सेवा बंद करण्यात येतील, मात्र आपत्कालीन सेवा सुरू राहतील. आमच्या सहकाऱ्यांबाबत सहानुभूती व्यक्त करण्यासाठी ओपीडी, ओटी, वॉर्ड ड्युटी, लॅब सेवा व शैक्षणिक ड्युटी थांबवण्यात येतील.

केंद्रीय हेल्थकेअर प्रोटेक्शन ॲॅक्टची तातडीने अंमलबजावणी करावी. डॉक्टरांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करावी. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही लावावेत, चांगल्या दर्जाची हॉस्टेल, दूरसंचाराच्या चांगल्या सुविधा देण्यात याव्यात, आदी मागण्या ‘मार्ड’ने केल्या. काम थांबवण्याचा निर्णय सोपा नाही. मात्र, आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा निर्णय घेणे गरजेचे आहे, असे ‘मार्ड’ने म्हटले आहे.

केईएम, नायर व सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी या बेमुदत संपात सहभागी होण्याचे ठरवले आहे.

...तर प्रकरण सीबीआयकडे सोपवणार - ममता बॅनर्जीं

कोलकाताच्या आर. जी. कर वैद्यकीय महाविद्यालयातील कनिष्ठ निवासी डॉक्टरच्या हत्या प्रकरणाचा छडा येत्या रविवारपर्यंत पूर्ण न झाल्यास हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात येईल, असा दम मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी कोलकाता पोलिसांना भरला आहे.

या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी. या घटनेबाबत मला माहिती मिळाल्यानंतर कोलकाता पोलिसांना याप्रकरणी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. रुग्णालयात नर्स, सुरक्षारक्षक असताना ही घटना घडली कशी? हे मला कळत नाही. रुग्णालयात कोणीतरी होते, असे पोलिसांनी मला सांगितले.

याप्रकरणी जलदगती न्यायालय स्थापित केले जाणार आहे. पोलीस, श्वान पथक, न्यायवैज्ञक पथक व अन्य पथके कामाला लागली आहेत. आरोपीला पकडण्यासाठी तपास सुरू केला आहे. येत्या रविवारपर्यंत या प्रकरणाचा छडा न लागल्यास आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवणार आहोत, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी