सुप्रिया सुळे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

दुधाला प्रति लिटर ४० रुपये दर मिळावा; खासदार सुप्रिया सुळेंचे दुग्धविकास मंत्र्यांना पत्र

दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई त्यात उत्पादनाच्या खर्चात वाढ यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.

Swapnil S

मुंबई : दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई त्यात उत्पादनाच्या खर्चात वाढ यामुळे दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्याला प्रतिलिटर ३५ रुपये खर्च येतो. मिळकत आणि उत्पादनाचा ताळमेळ बसावा यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रती लिटर ४० रुपये दर मिळावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सुप्रिया सुळे यांनी एक्सवर पोस्ट करत शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे.

महाराष्ट्र राज्यात दूध व्यवसाय हा शेतकऱ्यांसाठी एक प्रमुख जोडधंदा आहे. तर हा व्यवसाय शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. महाराष्ट्र राज्य देशात दूध उत्पादनात अग्रेसर आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात दुधाचे संकलन होते. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून दूध व्यवसायाकडे बघितले जाते. परंतु सध्याच्या काळात राज्यातील दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे.  एकीकडे दिवसेंदिवस दूध उत्पादनाचा खर्च वाढत आहे तर दुसरीकडे शासनाकडून दुधाचा दर कमी होत आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत, असेही सुप्रिया सुळे यांनी पत्रात नमूद केले आहे. 

सुळे यांनी म्हटले आहे की, दूध संघाकडून दुधाला केवळ २७  ते २८ रुपये प्रतिलिटर दर दिला जात आहे व सरकारकडून लिटर मागे ५ रुपये अनुदान दिले गेले. दूधू उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारा दर आणि अनुदान मिळूनही शेतकऱ्याला उत्पादन खर्च सुद्धा मिळत नाही. ऑक्टोबर २०२४ पासून अनुदान जमा नाही.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली