महाराष्ट्र

MLA disqualification : आमदार अपात्रतेचा निर्णय यंदा लागण्याची शक्यता कमीच ; आता तिसरी सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी

नवशक्ती Web Desk

14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज २५ सप्टेंबर विधान भवनाच्या मध्यवर्ती सभागृहात पार पडली. या सुनावणीमध्ये वेळापत्रक निश्चित होणार नसले तरी ही प्रक्रीया यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेचा निकाल यावर्षी लागणं कठीण असल्याचं बोललं जात आहे. आजच्या सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. दरम्यान, या संभाव्य वेळापत्रकात कागदपत्र तपासणी, त्याच बरोबर साक्ष नोंदवणं. उलट तपासणी मुद्यांचा समावेश असल्याने या प्रक्रियेत ३ महिने जाण्याची शक्यता आहे. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये असल्याने त्या दरम्यानच्या काळात सुनावणी होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे जानेवारी २०२४ मध्ये आमदार अपात्रतेचा निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाकरे गटाकडून अनिल देसाई, अनिल परब, सुनिल प्रभू तसंच मुंबईतील आमदार यावेळी उपस्थित आहेत. सुरुवातीला दोन्ही गटाकडून म्हणणं ऐकून घेतलं जाणार आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर एकूण ३४ याचिका आहेत. या याचिकांवर सुनावणी देण्यासाठी वेळापत्रक निश्चित होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांकडून दिरंगाई होत असल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यशैलीवर अत्यंत कडक शब्दात सुनावलं होतं. त्यानंतर सुनावणीला वेग आला होता.

गेल्या सुनावणीत ठाकरे गटाकडून कागदपत्रे न मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे कागदपत्र सादर करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. आजच्या सुनावणीनंतर सर्व दाखल याचिकांवर वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता आहे. विधानसभा अध्यक्षांकडे सर्व याचिकांवर एकाच वेळी सुनावणी घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

आजच्या सुनावणीत सर्व आमदार उपस्थित राहण्याची शक्यता नाही. त्या त्या गटाच्या वकिलांकडून आमदारांची बाजू मांडली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये गेल्या चार महिन्यात काय केलं? याचा लेखा जोखा मांडायचा आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मागच्या आठवड्यात दिल्ली दौरा करुन कादेतज्ज्ञांच्या भेटी गाठी घेतल्या होत्या. अता सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी ३ ऑक्टोंबर रोजी पुन्हा असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या तारखांमध्ये बदल देखील होण्याची शक्यता आहे.

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

गोल्डन चान्स! या फेमस Electric Scooter वर मिळतोय तब्बल १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही