महाराष्ट्र

अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार? भांडुप मतदारसंघ सोडण्याची शिंदे गटाची तयारी!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्यासाठी हक्काचा भांडुप मतदारसंघ सोडण्याची तयारी शिंद गटाने केली आहे.

Swapnil S

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांच्यासाठी हक्काचा भांडुप मतदारसंघ सोडण्याची तयारी शिंद गटाने केली आहे. अमित ठाकरे यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढाकार घेतल्याचे कळते.

अमित ठाकरेंनी भांडुप मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवल्याची माहिती आहे. उमेदवारी दिली गेली तर अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. पण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मात्र अजूनही अमित ठाकरे यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय घेतला नाही.

अमित ठाकरे यांच्यासाठी भांडुपसोबत मागाठाणे आणि माहीम मतदारसंघांचीही चाचपणी सुरू आहे. त्यांनी भांडुप, मागाठाणे आणि माहीम यापैकी एखाद्या मतदारसंघांतून निवडणूक लढवावी अशी मनसैनिकांची आग्रही मागणी आहे. तसे बॅनरही काही दिवसांपूर्वी मनसैनिकांनी लावले होते. दरम्यान, अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास शिवसेना (शिंदे गट) त्यांच्यासाठी जागा सोडण्यास तयार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत काय निर्णय घेतात आणि अमित ठाकरे निवडणूक लढतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मराठवाड्यात कोसळधार! ढगफुटी सदृश्य पावसाने गावांचा संपर्क तुटला, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

आता नोकरी मिळवणे होणार सोपे! केंद्र सरकार तयार करतेय ‘डॅशबोर्ड’

मतदार यादी सखोल परीक्षणासाठी सज्ज व्हावे; केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश

नवीन GST सुधारणांमुळे ग्राहकांना दिलासा; आजपासून अन्न, गृहनिर्माण, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, वाहने, शेती, आरोग्यसेवा स्वस्त

Mumbai : महालक्ष्मी मंदिरात ७७ CCTV ची नजर; नवरात्रोत्सवासाठी महालक्ष्मी मंदिराची सज्जता