महाराष्ट्र

मनसैनिकाला अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी बेदम चोपले? विजय वडेट्टीवारांनी शेअर केला व्हिडिओ, म्हणाले - ‘दादा'गिरी...

हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, तसेच त्यामागची नेमकी सत्यता काय? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Rakesh Mali

राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एक व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटावर मोठा आरोप केला आहे. या व्हिडिओत अजित पवार गटाचे काही कार्यकर्ते मिळून मनसे कार्यकर्त्याला बेदम मारहाण करत असल्यादा दावा वडेट्टीवारांनी केला आहे. यावरुन आता राज्य सरकारसह अजित पवार गटावर टीका होताना दिसत आहे.

अजित पवार गटाचे ठाण्यातील नेते नजीब मुल्ला यांचे पोस्टर फाडले म्हणून मनसे कार्यकर्त्याला मारहाण केल्याचे वडेट्टीवारांनी म्हटले आहे. "सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाचे नेते असे ‘दादा'गिरी करतात आणि कारवाई होत नाही", असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच, सत्ताधारी नेत्यांना दादागिरी करण्याचे, कायदा हातात घेण्याचे लायसन्स सरकारने दिले आहे का?, असा सवालही त्यांनी केला आहे.

वडेट्टीवार यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत एका मध्यमवयीन व्यक्तीला चार जण बेदम मारहाण करताना दिसत आहेत. या व्यक्तीला मारताना ते बॅनर फाडण्याबाबत विचारणा करत माफीही मागायला सांगत आहेत. तो व्यक्ती देखील आपणच बॅनर फाडल्याचे सांगतो. पण तो माफी काही मागत नाही.

दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, तसेच त्यामागची नेमकी सत्यता काय? याबाबत अद्याप कुठलीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, वडेट्टीवार यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक होण्याची शक्यता आहे.

मध्य प्रदेशातून येणार ५० हजार EVM; नवीन मशीनची दिली इसीआयएलला ऑर्डर; निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने कसली कंबर

लाडक्या बहिणींना खुशखबर! ऑक्टोबरच्या हफ्त्यासाठी निधी वितरणास मंजुरी

संभाव्य दुबार नावांबाबत उपाययोजना करा; राज्य निवडणूक आयोगाचे निर्देश

लाडकी बहीण योजनेचा प्राध्यापक भरतीला फटका; पाच हजार प्राध्यापकांच्या भरती मान्यतेला वित्त विभागाचा खोडा

Women’s World Cup : आज चुकीला माफी नाही! विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत भारतीय महिलांसमोर ऑस्ट्रेलियाचे आव्हान