महाराष्ट्र

मोदी पंतप्रधानपदासाठी लायक नाहीत! उद्धव ठाकरे कडाडले

Maharashtra assembly elections 2024 : देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे अमित शहा म्हणाले. मग आता मिंध्यांना म्हणा की, भांडी घासा. अजित पवारांना म्हणावे की मिंध्यांना भांडी घासायला माती द्या. मोदी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाहीत. अमित शहा हे गृहमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाहीत.

Swapnil S

औसा : देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, असे अमित शहा म्हणाले. मग आता मिंध्यांना म्हणा की, भांडी घासा. अजित पवारांना म्हणावे की मिंध्यांना भांडी घासायला माती द्या. मोदी पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाहीत. अमित शहा हे गृहमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायला लायक नाहीत. कारण तुम्ही तुमचे काम सोडून प्रचारासाठी फिरत आहात. महाराष्ट्र आता तुमच्या थापांना कंटाळला आहे, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांवर सडकून टीका केली.

औसा येथील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, “उद्धव ठाकरेला तुम्ही संपवले आहे तर त्याला अजून का घाबरता? मला सोलापूरला जायला एअरपोर्ट बंद ठेवले. ही काय लोकशाही आहे का? माझी बॅग तपासली जात असेल तर मोदी आणि शहा यांचीही बॅग तपासली पाहिजे. माझी येताना बॅग तपासता, तशी मोदी, शहा यांची जाताना बॅग तपासा. यांना मतदान करून चक्रव्यूहात अडकू नका.”

“दिल्लीत बसून मोदी-शहा यांना महाराष्ट्र हाकता येणार नाही, हे लक्षात ठेवा. मोदी आणि शहा हे महाराष्ट्र संपवायला निघाले आहेत. महाराष्ट्र लुटण्याच्या आड कुणी येऊ शकत असेल, तर ती फक्त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांची शिवसेना आहे. त्यांनी शिवसेनेवर घाव नाही घातलेला, तर महाराष्ट्राच्या मुळावर घाव घातला आहे,” अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली.

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ