महाराष्ट्र

गणेशोत्सवासाठी बहुतांश रेल्वे, एसटी बसेसचे आरक्षण पूर्ण 

देवांग भागवत

गणेशोत्सवनिमित्त मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी असते. रेल्वे, एसटी बसने कोकणाकडे जाण्यास सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. याच पार्श्वभूमीवर रेल्वे आणि एसटी प्रशासनाकडून ३ ते ४ महिने आधीच आरक्षण सुरु करण्यात आले. यानंतर अवघ्या काही दिवसातच आरक्षण पूर्ण झाले असून त्यानंतर सोडण्यात येणाऱ्या जादा अतिरिक्त गाड्यांचे बुकिंग देखील पूर्ण झाल्याचे दर्शवत आहे. परतीच्या प्रवासाच्या आरक्षणाचीही हीच स्थिती असून परतीच्या प्रवासाचे तिकीट मिळविण्यासाठी देखील प्रवाशांची धावपळ सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे. 

यंदा गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रमाण अधिक आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेने या उत्सवासाठी ७४ विशेष गाड्या आणि त्यांनतर आणखी काही गाड्यांचे नियोजन केले आहे. याशिवाय रोहा आणि चिपळूण दरम्यान गणपती उत्सवासाठी ३२ मेमू सेवा देखील सोडण्यात येणार आहेत. एप्रिल महिन्यापासून या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात झाली आहे. तर दुसऱ्या बाजूला २५०० जादा एसटी गाड्या सोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाकडून घेण्यात आला आहे. मात्र कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्यांबरोबरच विशेष रेल्वे गाड्यांनाही गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षायादी आहे. काही गाड्यांच्या श्रेणींच्या प्रतीक्षायादीचे तिकीट देणेही बंद करण्यात आले आहे. अशीच परिस्थिती परतीच्या प्रवासाची झाली असून बहुतांश रेल्वे आणि एसटी बसेसचे येण्या जाण्याचे आरक्षण पूर्ण झाले आहे. दरम्यान, तिकीट तपासले असता ४०० हून अधिक प्रतीक्षा यादी प्रवाशांना दिसत आहे. 

एसटी आरक्षणालाही उदंड प्रतिसाद मुंबई महानगर आणि पुण्यातून कोकणात जाण्यासाठी काही दिवसांपूर्वी जातानाच्या गट आरक्षणाच्या १ हजार ९६ बस, तर वैयक्तीरित्या ७०६ बसगाड्यांचे आरक्षण झाले होते. आणखी ७५५ गाड्यांचे आरक्षण सुरू होते. तर कोकणातून येताना ७०८ गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असे एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु सद्यस्थहोईटीत २५ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर दरम्यान २५०० जादा गाड्याचे येण्या-जाण्याची बहुतांश आरक्षण फुल्ल झाल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. २५ जूनपासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या तर ५ जुलैपासून पार्टीच्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात झाल्यानंतर चाकरमान्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पश्चिम महाराष्ट्रात कोणाचा गुलाल? मतदारांमध्ये उत्सुकता, मुद्यांवरून गुद्यांवर चर्चा

Youtuber Elvish Yadav: एल्विश यादवला आणखीन एक झटका, मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल, ED करणार चौकशी!

काय सांगता! Bajajनं आणली चक्क CNG BIKE, 'या' दिवशी होणार लॉन्च

"दिलेला शब्द पाळला नाही"; उमेदवारी नाकारल्याने खासदार गावित नाराज

वाढत्या उन्हाचा वाहतूक पोलिसांना फटका; वाहतूक नियमांची अंमलबजावणी करताना उडतेय तारांबळ