ANI
महाराष्ट्र

शिवसेनेला धक्का : सेनेच्या 'या' खासदारांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेची भेट

मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना पक्षाच्या एकूण 19 खासदारांपैकी 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन

वृत्तसंस्था

शिवसेनेचे ४० पेक्षा अधिक बंडखोर आमदार शिंदे गटामध्ये सामील झाल्यानंतर आता खासदार देखील त्याच मार्गावर म्हणजेच शिंदे गटाची वाट धरताना दिसत आहेत. मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना पक्षाच्या एकूण 19 खासदारांपैकी 12 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याव्यतिरिक्त ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची देखील भेट घेणार आहेत.

कोणत्या खासदारांनी घेतली शिंदेंची भेट ?

खासदार श्रीकांत शिंदे, राहुल शेवाळे, हेमंत पाटील, संजय मंडलिक, राजेंद्र गावित, प्रताप जाधव, भावना गवळी, हेमंत गोडसे, कृपाल तुमाने, श्रीरंग बारणे, धैर्यशील माने, सदाशिव लोखंडे यांनी आज दिल्लीमध्ये शिंदेची भेट घेतली.

एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी समेट घडवून आणावा. यामध्ये सर्वसामान्य शिवसैनिकांचे नुकसान होत असल्याचे सांगत खासदार संजय जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश नाकारला.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत