महाराष्ट्र

Jalgaon : जळगावातील तब्बल २४८ वीज कनेक्शन कट; नेमकं कारण काय?

जळगाव जिल्ह्यातील तब्बल २४८ शाळांमधील वीज कनेक्शन तोडण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली

प्रतिनिधी

जळगाव जिल्ह्यामध्ये तब्बल २४८ शाळांमधील वीज कनेक्शन तोडण्यात आले. वीज बिल थकवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. महावितरण विभागाकडून २४८ शाळांचे वीज मीटर काढण्यात आले. यामुळे शाळेमध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असून या बातमीने पूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील जिल्हापरिषदेच्या २५०हून अधिक शाळांची वीजबिलाची थकबाकी थकीत असल्याने महावितरण विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

वीज बिल थकविल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील २४८ शाळांचे वीज मीटर महावितरण विभागाने काढून घेतले. त्यामुळे या शाळांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान, ज्या शाळांमध्ये अनेक महिन्यापासून थकबाकी होती, ती वसूल होत नसल्याने महावितरणाकडून अशा शाळांचे वीज मीटर काढून घेण्याची कारवाई सुरु केली. यामुळे शाळा प्रशासनाचे नुकसान होत असल्याची टीका झाल्यानंतर मीटर काढून घेण्याची पुढील कारवाई थांबवली. मात्र, शाळांनी थकीत वीज बिले भरण्यासंदर्भात तातडीने पावले उचलावी, अशा सूचना जिल्हापरिषद प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

Mumbai : लालबागचा राजाच्या विसर्जनाला विलंब? तराफ्यावर मूर्ती चढवताना अडचणी

Maharashtra : बाप्पाच्या निरोपावेळी दुर्दैवी घटना; राज्यात ७ जणांचा मृत्यू

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

चौकशीची मागणी माझी वैयक्तिक! अंजना कृष्णा धमकीप्रकरणी मिटकरी यांचे घूमजाव