संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

एसटी चालकांसाठी खुशखबर; मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली महत्त्वाची घोषणा

एस.टी. महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत बोलताना परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या.

Swapnil S

मुंबई : विना अपघात सेवा बजावणाऱ्या एसटी चालकांसाठी खुशखबर आहे. दरवर्षी विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ते एस.टी. महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बोलत होते.

या बैठकीला एस.टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, कामगार आयुक्त तथा एसटी महामंडळाचे संचालक ह. पि. तुम्मोड, रेल्वे बोर्डाचे मुख्य वाणिज्य प्रबंधक तथा एसटी महामंडळाचे संचालक डॉ. सुमंत देऊलकर यांच्यासह एसटीचे खाते प्रमुख उपस्थित होते. मंत्री सरनाईक म्हणाले की, वर्षातील २६० दिवस विना अपघात सेवा बजवणाऱ्या चालकांचा रोख रक्कम देऊन १५ ऑगस्ट, २६ जानेवारी व १ मे या दिवशी सत्कार करण्यात येणार आहे. याबरोबरच पाच वर्षे, दहा वर्षे, पंधरा वर्षे, वीस वर्षे विना अपघात सेवा बजावणाऱ्या चालकांचा देखील तितकीच रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

२०४ बसस्थानकांवर एटीएम सुविधा

बस स्थानकावर येणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी राज्यातील २०४ बस स्थानकांवर एटीएम केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्याबद्दलची निविदा लवकरच प्रसारित करण्यात येणार असून राष्ट्रीयकृत बँकेबरोबरच अन्य बॅंकांची एटीएम सुविधा देखील बसस्थानकावर उपलब्ध होणार आहे.

नवीन लालपरीमध्ये ३ बाय २ आसन व्यवस्था

नव्या ३ हजार बसेस खरेदी करण्याच्या निविदा प्रक्रियेला संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता दिली. तथापि, या बसेसमध्ये पूर्वीप्रमाणे ३ बाय २ प्रकारची आसन व्यवस्था राहणार आहे. अर्थात आताच्या बस पेक्षा तब्बल १५ ते १७ अधिक प्रवासी नव्या बसमध्ये बसून प्रवास करतील.

१०० मिनी बसेस घेणार

नव्या बस खरेदीमध्ये १०० मिनी बसेस घेण्यात येणार असून त्या बसेस प्रामुख्याने डोंगराळ, दुर्गम भागामध्ये जिथे सध्याची लालपरी पोहचू शकत नाही, तेथे चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे अतिशय दुर्गम भागातील आदिवासी पाड्यापर्यंत देखील बस सेवा पुरवण्यात महामंडळ सक्षम होईल. त्यामुळे एसटीची सेवा शेड्युल ट्राईब लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एसटी कटीबद्ध राहणार आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले.

सुप्रीम कोर्टाचा मोठा आदेश! दिल्ली-NCR मधील सर्व भटक्या कुत्र्यांना उचला, शेल्टरमध्ये सोडा; अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करा

Pune : कुंडेश्वर दर्शनाला जाताना काळाचा घाला; खचाखच भरलेली पिकअप व्हॅन रस्त्याच्या उतारावरून २५-३० फूट खाली कोसळली, ७ जणांचा मृत्यू

मुंबई-गोवा महामार्गाचा महाराजा! सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आगळेवेगळे आंदोलन; यंदा थेट महामार्गावरच गणेशोत्सव

वेगमर्यादेचे उल्लंघन! Mumbai Pune Expressway वर ४७० कोटींचे चलन जारी, मात्र...

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा