संग्रहित फोटो  
महाराष्ट्र

'मी सरकारविरोधात बोलले की पतीला नोटीस येते', सुप्रिया सुळेंचा केंद्र सरकारवर आरोप

केंद्र व राज्यातील सरकार सत्तेसाठी विविध यंत्रणांचा गैरवापर करते, असा आरोप खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे.

Swapnil S

मुंबई : केंद्र व राज्यातील सरकार सत्तेसाठी विविध यंत्रणांचा गैरवापर करते. संसदेत केंद्र सरकार विरोधात काहीही बोलले तर लगेचच सदानंद सुळे यांना आयकर विभागाची नोटीस येते हा योगायोग म्हणावा का? नोटीस तीच फक्त तारखेत बदल असतो, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

राज्यातील मराठा आरक्षणाविषयी सुळे म्हणाल्या की, राज्य सरकारने या प्रश्नाकरिता विशेष अधिवेशन बोलविण्याची गरज आहे. या अधिवेशनात चर्चा करून आरक्षणाविषयी बिल केंद्र सरकारकडे पाठवले पाहिजेत, असे सुळे म्हणाल्या.

शिवसेना शिंदे गटाने संसदेत उत्तम भूमिका मांडली. अजित पवार आणि शिंदे युती सरकारमध्ये आहेत. मग शिंदेंची आणि अजित पवार यांची भूमिका एकच आहे का? अजित पवारांच्या पक्षाने संसदेत भूमिका मांडल्याचे माझ्या ऐकिवात नाही, असा चिमटा सुळे यांनी काढला.

व्हॉट्सॲप सुरू करण्यासाठी ४०० डाॅलरची मागणी

फोन हॅक करणाऱ्याने आपल्याकडे व्हॉट्सॲप अकाऊंट परत सुरू ४०० डाॅलरची मागणी केली होती. मात्र हॅकरकडून अकाऊंट परत मिळवण्यासाठी पैसे दिले नाहीत, खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. व्हॉट्सॲप हॅक झाल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. दरम्यानच्या काळात कुणी मेसेज केले असतील तर त्यांना मला या तांत्रिक बिघाडामुळे रिप्लाय करता आला नाही, याबद्दल क्षमस्व, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

मला फोनवर ओळखीच्या व्यक्तीकडून मेसेज आला होता. हा मेसेज ओपन केल्यानंतर माझा फोन हॅक झाला. तसेच माझ्या जवळच्या दोन ते तीन व्यक्तींचादेखील मोबाईल हॅक झाला. पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस अदिती नलावडे यांचादेखील मोबाईल हॅक झाला होता. तसेच माझ्या आणि अदिती नलावडे यांच्या मोबाईलवरून १० हजार रुपये पाठवा, असे मेसेज करण्यात आले होते.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी