महाराष्ट्र

Nanded News : गोदावरीत बुडून ५ भाविकांचा मृत्यू; दर्शनाआधी पवित्र स्नानासाठी उतरले होते नदीत

तीर्थक्षेत्र बासर येथे कुटुंबासोबत दर्शनासाठी आलेल्या ५ भाविक युवकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली.

Swapnil S

नांदेड : धर्माबाद येथून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र बासर येथे कुटुंबासोबत दर्शनासाठी आलेल्या ५ भाविक युवकांचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना रविवारी दुपारी घडली. दरम्यान, मयत युवक हे हैदराबाद येथील रहिवाशी असल्याचे समोर आले आहे.

धर्माबाद येथून जवळच असलेल्या तीर्थक्षेत्र बासर येथे दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. यामुळे येथे नेहमीच भाविकांची वर्दळ असते. हैदराबादमधील चिंतल बाजार येथे राहणाऱ्या कुटुंबातील १८ भाविक बासर येथे देवीच्या दर्शनासाठी रविवारी सकाळी आले होते. दर्शनापूर्वी गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी हे सर्व गेले होते. परंतु, त्यातील ५ युवकांना पाण्याचा अंदाज आला नाही, त्यामुळे ते पाण्यात साचून असलेल्या गाळात फसले. यानंतर काही वेळातच या ५ युवकांचा बुडून मृत्यू झाला.

ही माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाचे पथक, जीव रक्षक दलाचे जवान पाण्यात उतरले. काही वेळाच्या शोधानंतर पथकाने राकेश (१७), विनोद (१८), ऋतिक (१८), मदन (१७) व भरत (१८) या ५ युवकांचे मृतदेह नदीतून बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी म्हैसा येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video