(प्रातिनिधिक छायाचित्र)
महाराष्ट्र

नांदेड : पतंग उडविताना नायलॉन मांजा वापरल्यास तुरुंगवास; ३६ पोलीस ठाण्यांमध्ये विशेष पथकांची नियुक्ती

करसंक्रांती सणानिमित्त पतंग उडविण्याची परंपरा आहे.परंतु हा पतंग उडविण्यासाठी नायलॉन आणि सिंथेटीक धाग्यापासून बनविलेल्या धोकादायक मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो.

Swapnil S

नांदेड : मकरसंक्रांती सणानिमित्त पतंग उडविण्याची परंपरा आहे.परंतु हा पतंग उडविण्यासाठी नायलॉन आणि सिंथेटीक धाग्यापासून बनविलेल्या धोकादायक मांजाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येतो.

हा मांजा मानव आणि पशु-पक्ष्यांच्या जीवावर उठत असून, त्यावर बंदी घालण्यात आली आहे. अनेक ठोक - किरकोळ विक्रेते छुप्या मार्गाने या मांजाची विक्री करण्यात येते. त्यामुळे त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी ३६ पोलिस ठाण्यांमध्ये विशेष पथके नियुक्त करण्यात आली असून, संबंधित विक्रेता आणि मांजाचा वापर करणारा अशा दोघांवरही कारवाई करण्याचा इशारा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी दिला आहे. मकर संक्रांत सणानिमित्त राज्यात तसेच परराज्यात सुध्दा पतंग उडविण्याची परंपरा आहे.

विशेष करून बच्चे कंपनीसह तरुणाईही पतंग उडविण्याचा आनंद लुटतात. परंतु या पतंगोत्सवात काटाकाटी करण्यासाठी नायलॉन आणि सिंथेटीक मांजाचा वापर करण्यात येतो. आजपर्यंत पशू- पक्ष्यांच्याही जीवावर हा मांजा उठला आहे. त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली असून, अनेकांवर गुन्हेही नोंदविण्यात आले आहेत.

पोलिसांचे आवाहन

मागील वर्षी हा मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. या वर्षीही नांदेड जिल्ह्यातील ३६ पोलीस ठाण्यामध्ये विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. अशा प्रकारचा मांजा विक्री होत असल्यास नागरिकांनी ११२ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी; माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल