महाराष्ट्र

नांदेड महापालिकेने केली पाणीपट्टी दरात कपात

महापालिकेने २०२३ - २४ या वर्षासाठी पाणीपट्टी दरामध्ये वाढ केली होती

Swapnil S

नांदेड : नांदेड - वाघाळा महापालिकेने पाणीपट्टी दरामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला समितीने महापालिकेत गुरूवारी (ता. २५) बैठक घेऊन याबाबतची शिफारस केली आहे. त्यामुळे नळजोडणीधारकांसाठी हा दिलासा देणारा निर्णय ठरला आहे.

महापालिकेने २०२३ - २४ या वर्षासाठी पाणीपट्टी दरामध्ये वाढ केली होती; मात्र, अनेक आजी, माजी लोकप्रतिनिधींसह विविध पक्ष, संस्था, संघटना तसेच नागरिकांच्या वतीने पाणीपट्टी दराचे दर कमी करावेत, अशी मागणी व निवेदने आली. त्यामुळे महापालिकेने १८ डिसेंबर २०२३ रोजी पाणीपुरवठा दरवाढीचे पुर्नविलोकन करण्यासाठी समिती गठीत केली. त्यात अतिरिक्त आयुक्त, मुख्य लेखा परिक्षक, मुख्य लेखाधिकारी, शहर अभियंता आणि कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग यांचा समावेश होता.

समितीने बैठक घेऊन त्यामध्ये घरगुती नळासाठी अर्धा इंचीसाठी चार हजार तीनशे ऐवजी साडेतीन हजार रुपये, व्यावसायिक अर्धा इंचीसाठी २२ हजार ऐवजी १७ हजार ७५० रुपये समितीने शिफारस केली आहे. दारिद्रय रेषेखालील (बीपीएल) नळ जोडणीधारकास ५० टक्के कमी दराने म्हणजेच एक हजार ७५० रुपये दराने पाणीपट्टी लागू करण्यासाठी समितीने शिफारस केली आहे. इतरही विविध प्रकारचे पाणीपट्टीचे दर कमी करण्यात आले असल्याची माहिती समितीच्या वतीने अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम यांनी दिली आहे.

समितीने केलेल्या शिफारसीमुळे महापालिकेने पाणीपट्टी दरात कपात केली असून, पाणीपट्टीवरील शास्तीही ५० टक्के माफ केली आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपट्टी भरून सहकार्य करावे तसेच अधिकृत नळजोडणी घ्यावी, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी केले आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास