Instagram
महाराष्ट्र

कोकणातून भाजप नेतृत्वाला सुखद धक्का, रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणे विजयी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय मिळवला.

Swapnil S

सुनील नलावडे /रत्नागिरी

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात अटीतटीच्या लढतीत भाजप महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विजय मिळवला. आपले प्रतिस्पर्धी उमेदवार ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा त्यांनी ४७,९१८ मतांनी पराभव केला. राणेंच्या या विजयामुळे विनायक राऊत यांचा सलग तिसऱ्यांदा खासदारकी जिंकून विजयाची हटट्रिक करण्याचे स्वप्न भंगले. राणेंच्या विजयानंतर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती भाजप कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे पुत्र तत्कालीन खासदार निलेश राणे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. नंतर २०१९ मध्ये निलेश राणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असता खासदार राऊत यांनी निलेश राणेंचा पराभव करत दुसऱ्यांदा खासदार झाले. आता सलग तिसऱ्यांदा खासदार होण्याचे स्वप्न मात्र भंगले. नारायण राणे यांचा सिंधुदुर्ग रत्नागिरी मतदारसंघावर जबरदस्त प्रभाव असल्यामुळे भाजपच्या केंद्रीय पातळीवरून नारायण राणे यांना ऐनवेळी निवडणूक लढण्याचे आदेश दिले गेले. प्रचाराला मिळालेल्या कमी कालावधीत सुद्धा जबरदस्त व्यूहरचना करत आपल्या पारंपरिक कट्टर विरोधकांशी एक पाऊल पुढे जाऊन सामंजस्य निर्माण करून जुन्या शिवसैनिकांना भाजपमधील सर्वच गटातील लोकांना विश्वासात घेत गनिमी कावा पद्धतीने प्रचाराची सूत्रे स्वतः हाती घेत या मतदार संघात लढत दिली.

केसरकर यांची भरीव मदत - नारायण राणे

कोकणात कमळ फुलले त्याचा मला आनंद आहे. आता गोड गोड वाटतंय असे म्हणत अब की बार मेरी बारी. आता विरोधकांचे नामोनिशान ठेवणार नाही, अशी प्रतिक्रिया नवनियुक्त खासदार नारायण राणे यांनी दिली. आपल्या विजयात मंत्री दीपक केसरकर यांचा एक नंबरचा वाटा असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. त्यासोबत उदय सामंत यांनी सुद्धा काम केल्याचे म्हटले आपल्या मुलानी तसेच कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट घेतल्यामुळे आपण विजयी झालो, असे नारायण राणे यांनी सांगितले.

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

मध्य प्रदेशात परीक्षेदरम्यान आयएएस अधिकाऱ्याची विद्यार्थ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

कर्नाटकातील गोकर्ण गुहेतून रशियन महिलेची सुटका

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद