नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खानची पुढची सुनावणी १२ जूनला 
महाराष्ट्र

नाशिक टीसीएस प्रकरण : निदा खानची पुढची सुनावणी १२ जूनला

नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस युनिटमध्ये कथित लैंगिक छळ आणि सक्तीने धर्मांतर केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या निदा खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी नाशिकच्या न्यायालयाने शनिवारी १२ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे.

Swapnil S

नाशिकः नाशिकमधील टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस युनिटमध्ये कथित लैंगिक छळ आणि सक्तीने धर्मांतर केल्याप्रकरणी आरोपी असलेल्या निदा खानच्या जामीन अर्जावरील सुनावणी नाशिकच्या न्यायालयाने शनिवारी १२ जूनपर्यंत पुढे ढकलली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथे अटक करण्यात आलेल्या निदा खानला ११ मे रोजी २४ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर तिची कोठडी वाढवण्यात आली असून, ३० मे रोजी तिच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार होती.

शनिवारी, अतिरिक्त सत्र न्यायाधीश के. जी. जोशी (नाशिक रोड) यांनी निदा खानच्या जामीन अर्जावरील पुढील सुनावणीसाठी १२ जून ही तारीख निश्चित केली. निदासोबतच, या प्रकरणातील इतर आरोपी दानिश शेख आणि तौसीफ अत्तार यांच्या जामीन अजर्जावरही त्याच दिवशी सुनावणी होणार आहे. एसआयटीने आतापर्यंत या प्रकरणांशी संबंधित दोन दोषारोपपत्रे दाखल केली आहेत.

आजचे राशिभविष्य, १८ सप्टेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

सरकारी संवेदनशीलतेचाच दुष्काळ!

उपोषण मागे! सरकारशी चर्चेनंतर मनोज जरांगेंचा निर्णय; दिली तीन महिन्यांची अंतिम मुदत

डीजीपींच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास केवळ ‘सौम्य शिक्षा’?; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

महिलांची आज जपानशी सलामी! आशिया चषक विजेता भारतीय संघ आता आशियाई स्पर्धेच्या मोहिमेवर