महाराष्ट्र

Pune : नवले पुलावर आणखी एक अपघात; चार जखमी

प्रतिनिधी

गेले काही दिवस नवले पुलावर (Navale Bridge) अपघातांचे सत्र सुरूच आहे. (Pune) बुधवारी पहाटे ५च्या सुमारास एका पीकअप गाडीला अपघात झाला. या गाडीमध्ये एकूण ८ प्रवासी होते, तर अपघातात ४ जण जखमी झाले आहेत. याबाबत घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस तसेच हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त वाहन क्रेनच्या साहाय्याने बाजूला केले. तसेच जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पिकअप वाहनचालकाने सांगितले की, माझ्या वाहनाला पाठीमागून ट्रकने धडक दिली. त्यामुळे आमचे वाहन पलटी झाले.

गेले काही दिवस पुण्यातील नवले ब्रिजवर अनेक अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वी एका ट्रक चालकाने तब्बल ४७ गाड्यांना उडवले होते. त्यानंतर प्रशासनाच्या अनेक बैठकी झाल्या, मात्र अद्याप तिकडे कोणतीही उपाययोजना केलेली दिसत नाही. वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात नागरिक संतप्त झालेले आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होते आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, २०१४पासून २०२२पर्यंत दरी पूल ते नवले पूल आणि धायरी पूल या ३.५ किलोमीटरच्या अंतरामध्ये तब्बल १८५ अपघात झाले असल्याचे समोर आला आहे. या अपघातांमधे तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाला असून १५०हून अधिक जखमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल

विनातिकिट प्रवास हा गुन्हाच- हायकोर्ट; उच्चपदस्थ अधिकाऱ्याला तूर्तास दिलासा

माढ्यात फडणवीसांनीही टाकला डाव; अभिजित पाटील, धवलसिंह भाजपच्या गळाला?

दक्षिण भारतात पाण्याची भीषण टंचाई, केवळ १७ टक्के जलसाठा; महाराष्ट्र, गुजरातमध्येही परिस्थिती भीषण