महाराष्ट्र

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस

गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आंदोलनाचे प्रमुख लक्ष्मण हाके आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील शाब्दिक संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.

Swapnil S

पुणे : गेल्या काही दिवसांपासून ओबीसी आंदोलनाचे प्रमुख लक्ष्मण हाके आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील शाब्दिक संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे. अजित पवारांबद्दल नेहमी हेतुपुरस्सर बेताल आणि शिवराळ भाषेत वक्तव्य करत असल्याचा आरोप करत, बारामती येथील नितीन संजय यादव यांनी लक्ष्मण हाके यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. या नोटीसमध्ये लक्ष्मण हाके यांनी सात दिवसांच्या आत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची लेखी माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जर हाके यांनी माफी मागण्यास नकार दिला, तर त्यांना न्यायालयात खेचून त्यांच्याविरुद्ध दिवाणी, फौजदारी आणि अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा यादव यांनी दिला आहे.

ओबीसी समाजाच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत, तोवर आम्ही दिवसाला शेकडो शिव्या देऊ असे हाके यांनी सांगितले .ओबीसींसाठी जीव गेला तरी बेहत्तर अशी भूमिका त्यांनी घेतली.

अजिबात माफी मागणार नाही - हाके

या कायदेशीर नोटीसला लक्ष्मण हाके यांनी अत्यंत आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले आहे. "मी असल्या नोटीसला भीक घालत नाही," असे म्हणत त्यांनी अजित पवार यांची अजिबात माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे. हाके यांनी स्पष्ट केले आहे की, "ओबीसीच्या प्रश्नांसाठी मी अजित पवारांना रोज शंभर शिव्या देणार आहे."

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

दुबेला शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ! मराठी अस्मितेशी तोडजोड नाही - पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा पुनरुच्चार