अजित पवार- शरद पवार  
महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र; अजित पवार यांची घोषणा

पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

Swapnil S

पुणे : पिंपरी-चिंचवड महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

खासदार अमोल कोल्हे आणि रोहित पवारांसोबत झालेल्या तीन गुप्त बैठकांमध्ये अजित पवारांची आघाडी करण्याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली. अखेर या बैठकांना आता मूर्त रूप आल्याचे दिसून येत असून, दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र उमेदवारांच्या नावांची यादी सोमवारी जाहीर होऊ शकते.

अजित पवार यांनी पिंपरीतील भाषणात दत्ता काका साने यांच्या आठवणी यावेळी जागवल्या. महापालिकेत ‘साटेलोट’ चालले आहे, वारेमाप खर्च चालला आहे. जॅकवेल निविदा ३० टक्क्यांनी वाढविण्यात आली. कुदळवाडीत जमिनी बळकावण्यात आल्या आहेत. संत पीठात वारकरी घडवायचे होते, मात्र तिथे संतपीठात सीबीएससी स्कूल सुरू केली आहेत. संत पीठ हे फक्त नावापुरते राहिले आहे, असे म्हणत अजित पवारांनी नाव न घेता भाजपवर टीका केली.

जे ठरले होते ते का थांबवण्यात आले, वेगळ्या पद्धतीचे राजकारण जे चालल ते थांबवायला हवे. पिंपरी चिंचवड शहरातील माझ्या २५ वर्षांच्या राजकारणात मी कधी कर्ज काढले नव्हते. आज महापालिकेवर कर्ज झाले आहे, हे पाप कोणाचे? असा सवाल करत अजित पवार यांनी नाव न घेता महेश लांडगे यांच्या कारभाराकडे लक्ष वेधले. शहरात टँकर माफिया चालत आहेत, मुठभर लोकांना पोसण्यासाठी तुम्ही लोकांना पाणी देत नाही, असेही पवार म्हणाले.

पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे ‘मिशन १२५’

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत भाजपने स्वबळाचा नारा दिला असून भाजपने ‘मिशन १२५’ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. पिंपरी चिंचवडमध्ये विरोधकांच्या फक्त तीन जागा निवडून येतील, असे भाजपकडून सांगितले जात आहे. त्यावरुन, राष्ट्रवादीने भाजपवर टीका केली. भाजपला त्यांचा अतिआत्मविश्वास आणि घमेंड नडेल. याठिकाणी भाजपचे नेते १२५ जागा जिंकण्याची भाषा करत आहेत. पण त्यांनी १२५ जागा जिंकल्या तर मी राजकारण कायमचे सोडून देईन, असे वक्तव्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते योगेश बहल यांनी केले.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली