महाराष्ट्र

राज्यातील वीज ग्राहकांना नववर्षाची भेट! ‘गो ग्रीन’धारकांना वीजबिलात १२० रुपयांची तत्काळ सवलत

महावितरणने राज्यातील वीज ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. वीज बिलासाठी ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडल्यानंतर ग्राहकांना तत्काळ बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे.

Swapnil S

मुंबई : महावितरणने राज्यातील वीज ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. वीज बिलासाठी ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडल्यानंतर ग्राहकांना तत्काळ बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्याची घोषणा महावितरणने केली आहे.

महावितरणकडून ‘कागद वाचवा, पर्यावरण वाचवा’ या संकल्पनेनुसार ‘गो-ग्रीन’ सेवा राबविण्यात येत आहे. त्यानुसार यापूर्वी या योजनेअंतर्गत ग्राहकांना मासिक वीज बिलात १० रुपये सूट दिली जात होती. मात्र आता यापुढे पहिल्याच बिलात पुढील १२ महिन्यांसाठी तत्काळ १२० रूपये एकरकमी सवलत मिळणार आहे. ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना महावितरणकडून दरमहा छापील कागदी बिलाऐवजी ‘ई-मेल’द्वारे वीज बिल पाठविण्यात येते. शिवाय ‘गो ग्रीन’ ग्राहकांना मासिक वीज बिलात १० रुपये सूट देण्यात येते. मात्र यापुढे ‘गो ग्रीन’ सेवा निवडणाऱ्या ग्राहकांना वीज बिलात एकरकमी १२० रुपये सूट देण्यात येणार आहे.

महावितरणच्या ३ कोटी लघुदाब ग्राहकांपैकी अद्यापपर्यंत ४ लाख ६२ हजार म्हणजेच १.१५ टक्के ग्राहकांनी ‘गो ग्रीन’ सेवेचा पर्याय निवडला आहे. भविष्यात हे प्रमाण वाढण्यासाठी, महावितरणने ‘गो ग्रीन’ पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांना वीजबिलात तत्काळ एकरकमी सूट देण्याचा निर्णय घेतला आहे.

सर्व नोंदणीकृत वीज ग्राहकांना महावितरणकडून गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडण्यासाठी एसएमएस पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील वर्षभर व सेवेसाठी नोंदणी रद्द करेपर्यंत नोंदणीकृत ई-मेलवर वीज बिल पाठविण्यात येईल. ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे महावितरणने आवाहन केले आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन