महाराष्ट्र

'22 जानेवारीला सुट्टी नको, आमचा अभ्यास बुडाला तर रामलल्ला...' 'स्मितालय'च्या विद्यार्थिनींनी नाकारली सुट्टी

Swapnil S

‘स्मितालय’च्या विद्यार्थिनींनी नाकारली २२ जानेवारीची सुट्टी

पुणे : अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त सुट्टी नको. आमचा अभ्यास बुडला, तर रामलल्ला सुद्धा खुश होणार नाहीत, असे म्हणत प्रख्यात नृत्यांगना झेलम परांजपे यांच्या ‘स्मितालय’ शाळेतील विद्यार्थिनींनी २२ जानेवारीची सुट्टी नाकारली आहे. झेलम परांजपे यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत शाळेतील विद्यार्थिनींच्या या निर्णयाची माहिती समोर आणली आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिरात रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी २२ जानेवारी रोजी केंद्र आणि अनेक राज्यांच्या सरकारांनी तसेच काही खासगी आस्थापनांनीही सुट्टी जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला या दिवशी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. महाराष्ट्र सरकारनेदेखील सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. परंतु, झेलम परांजपे अध्यक्षा असलेल्या शाळेतील विद्यार्थिनींनी ही सुट्टी नाकारली आहे. त्याबद्दल खुद्द झेलम परांजपेंनी फेसबुक पोस्ट लिहून म्हटले आहे की, ‘आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरं...सरकारी जीआर शेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येवो, आम्हाला राम प्राणप्रतिष्ठापनेची सुट्टी नको. आमचा अभ्यास बुडाला तर रामलल्लासुद्धा खुश नाही होणार...आमच्या अध्यक्षा झेलम ताईंनी निर्णय घेतला आहे की, शाळा चालू राहणार, त्यामुळे आम्ही सुट्टी घेणार नाही...’ असे त्यांनी लिहिले आहे. या पोस्टवर अनेकांनी लाइक आणि कमेंट करून पाठिंबा दर्शवला आहे. ही पोस्ट अनेकांनी शेअर केली असून, सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त