महाराष्ट्र

चाकणकर यांच्याविरोधात अश्लील पोस्ट, दोघांना अटक

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पवार गट) महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल अश्लील मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने दोघांना अटक केली आहे.

Swapnil S

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार पवार गट) महिला आघाडीच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याबद्दल अश्लील मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने दोघांना अटक केली आहे.

चाकणकर यांनी यापूर्वी ३२ जणांची यादी पोलिसांकडे सादर केली होती. इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर आपल्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्याचा आरोप चाकणकर यांनी केला होता.

सायबर पोलिसांनी चुनाभट्टी येथील जगन्नाथ तुषार दिलीप हत्ते (३०) आणि गंगापूर येथून सनी पारखे (२४) यांना अटक केली. महिलेचा अवमान केल्याप्रकरणी बदनामी आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चाकणकर यांनी लक्ष्मण शिंदे तसेच स्वराज भोसलेविरुद्ध बदनामी केल्याच्या तक्रारी केल्या आहेत.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत