ओमराजेंचा यू टर्न? ५ जणांची खासदारकी धोक्यात 
महाराष्ट्र

ओमराजेंचा यू टर्न? ५ जणांची खासदारकी धोक्यात

'पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही...

Swapnil S

धाराशिव : 'पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,' अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या 'ऑपरेशन टायगर'चे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर आणि ५ जणांची खासदारकी संकटात आल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे ओमराजे निंबाळकर यांनी आपण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याचे स्पष्ट संकेत याआधी दिले होते.

'भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतो, पण राजकीयदृष्ट्या विचार केल्यास तो बरोबर आहे,' असे समर्थनही त्यांनी केले होते. मात्र, शनिवारी पवनराजे हत्याकांडाचा निकाल येताच, त्यांनी या भूमिकेवरून 'यू टर्न' घेतल्याचे दिसते.

मनमानी वेतन कपातीला लगाम; कामाचे तास, साप्ताहिक सुट्टीबाबत महाराष्ट्र वेतन नियम २०२६ लागू

हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून; दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांना मदत हे कळीचे मुद्दे

Mumbai : वर्षभर रस्ते स्वच्छ ठेवा; VIP भेटीवेळीच देखावा नको; उच्च न्यायालयाने महापालिकेला सुनावले

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरून वाद : पालिकेत ठाकरे सेनेसह काँग्रेसचाही सभात्याग

बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरून वादंग; शायना यांनी सोनियांच्या पुस्तकातील फोटो फाडल्याने विरोधकांकडून टीकेची झोड